सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मोठी राजकीय घडामोड : राष्ट्रवादीचं अध्यक्षपद पवार कुटुंबातच राहणार? सुनेत्रा पवारांच्या नावाची जोरदार चर्चा
  • मोठी बातमी! राज्य सरकारकडून अजित पवारांच्या विमान अपघाताच्या सीआयडी चौकशीचे आदेश; एक्सिडेंटल डेथ रिपोर्टच्या अनुषंगानेही तपास
  • जिल्हा परिषद व पंचायत समित्यांसाठी ५ ऐवजी ७ फेब्रुवारी रोजी मतदान; ९ फेब्रुवारी २०२६ रोजी मतमोजणी
  • शरद पवारांनी घेतलं अजित पवारांच्या अस्थींचं दर्शन; विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात आजही मोठी गर्दी
 राजकारण

पवार कुटुंबाची बारामतीत महत्त्वाची बैठक; अजित पवार स्मारकावर चर्चा — रोहित पवारांची भूमिका

डिजिटल पुणे    05-02-2026 15:36:30

बारामती: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर पवार कुटुंबाकडून आज बारामतीत महत्त्वाची कौटुंबिक बैठक घेण्यात आली. या बैठकीत अजित पवार यांच्या स्मारक उभारणीसह कुटुंबाशी संबंधित ट्रस्ट व सामाजिक विषयांवर चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. बैठकीनंतर आमदार रोहित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधत कुटुंबाची भूमिका स्पष्ट केली.बैठकीला शरद पवार, प्रतिभा पवार, श्रीनिवास पवार, राजेंद्र पवार, रोहित पवार, रणजित पवार तसेच विद्या प्रतिष्ठानचे विश्वस्त उपस्थित होते. प्राथमिक चर्चेनुसार विद्या प्रतिष्ठान परिसरात स्मारक उभारण्याचा विचार सुरू असल्याचे समजते, मात्र अंतिम निर्णय अद्याप झालेला नाही.

स्मारक व संग्रहालयाचा विचार

रोहित पवार यांनी सांगितले की, अजित पवार यांच्या नावाचे सन्माननीय स्मारक व्हावे, अशी कुटुंबाची भावना आहे. हे स्मारक सर्वसामान्यांना सहज पाहता येईल अशा ठिकाणी असावे, यावर चर्चा झाली. तसेच शरद पवार यांच्या 35–40 वर्षांच्या सार्वजनिक जीवनाचा आढावा घेणारे संग्रहालय (म्युझियम) उभारण्याचीही कल्पना मांडण्यात आली आहे. पुढील काही दिवसांत संबंधित संस्था व विश्वस्तांकडून याबाबत अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.

“9 तारखेनंतर राजकीय भूमिका स्पष्ट करू”

28 तारखेला झालेल्या विमान अपघातानंतर कुटुंबात कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचे रोहित पवार यांनी सांगितले. ते म्हणाले की, सध्या कुटुंब भावनिकदृष्ट्या कठीण काळातून जात आहे. त्यामुळे 9 तारखेनंतरच राजकीय मुद्द्यांवर स्पष्ट भूमिका मांडली जाईल.तसेच विमान अपघातात नेमके काय घडले याबाबत काही प्रश्न असल्याचे त्यांनी नमूद केले. राज्य सरकार, केंद्र सरकार व संबंधित कंपनीकडून योग्य माहिती मिळेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

राजकीय चर्चांवर नाराजी

सध्याच्या राजकीय आरोप-प्रत्यारोपांवर भाष्य करताना रोहित पवार म्हणाले की, अजित पवार यांच्या योगदानापेक्षा इतर विषयांवर चर्चा होत असल्याचे पाहून कुटुंबाला वेदना होत आहेत. या संवेदनशील काळात राजकारण बाजूला ठेवले पाहिजे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.


 Give Feedback



 जाहिराती