सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मोठी राजकीय घडामोड : राष्ट्रवादीचं अध्यक्षपद पवार कुटुंबातच राहणार? सुनेत्रा पवारांच्या नावाची जोरदार चर्चा
  • मोठी बातमी! राज्य सरकारकडून अजित पवारांच्या विमान अपघाताच्या सीआयडी चौकशीचे आदेश; एक्सिडेंटल डेथ रिपोर्टच्या अनुषंगानेही तपास
  • जिल्हा परिषद व पंचायत समित्यांसाठी ५ ऐवजी ७ फेब्रुवारी रोजी मतदान; ९ फेब्रुवारी २०२६ रोजी मतमोजणी
  • शरद पवारांनी घेतलं अजित पवारांच्या अस्थींचं दर्शन; विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात आजही मोठी गर्दी
 शहर

निवडणुकीतील आश्वासनाप्रमाणे ५०० स्क्वेअर फुटापर्यंत मिळकतीना करमाफी द्या: आम आदमी पार्टी

डिजिटल पुणे    06-02-2026 14:35:45

पुणे : पुणे महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी 2026- 27 साठी चा अर्थसंकल्प प्रस्ताव या पुढील मांडलेला असून त्यामध्ये दहा टक्के मिळकत दरवाढ प्रस्तावित केलेली आहे. या संबंधातील प्रस्ताव स्थायी समिती बैठकीमध्ये आलेला आहे. आज आम आदमी पार्टीने पुणे महानगरपालिकेच्या बाहेर या करवाढीच्या विरोधामध्ये तीव्र आंदोलन केले. सामान्य पुणेकर महागाईने भरडला गेलेला असताना आणि त्याला योग्य सुविधा मिळत नसताना अशी करवाढ संयुक्तिक नाही, यावेळेस या महानगरपालिका निवडणुकीमध्ये भाजपने ५०० स्क्वेअर फुटापर्यंत मिळकतींना पूर्ण करमाफीचे आश्वासन दिले होते. त्यामुळे आता ते आश्वासन पूर्ण करावे अशी मागणी या आंदोलनात करण्यात आली.

गेल्या वर्षीच्या अंदाजपत्रकात २८०० कोटीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. परंतु प्रशासनाने आतापर्यंत केवळ २२०० कोटी जमा केले आहेत. तसेच अनेक व्यावसायिक मिळकतींवर कर लागू केला गेलेला नाही. गंभीर बाब म्हणजे थकीत ७७०० कोटी रक्कम ही  अजूनही येणे असून ती रक्कम वसूल करण्याऐवजी प्रामाणिक करदात्यावर या करवाढीचे ओझे टाकणे पूर्णपणे अयोग्य आहे अशी आम आदमी पार्टीची भूमिका आहे. आंदोलनादरम्यान पुणे महानगरपालिका आयुक्तांना या मागण्याचे निवेदन सुपूर्त करण्यात आले.

या आंदोलनात आम आदमी पार्टीचे मुकुंद किर्दत, सुदर्शन जगदाळे, शंकर थोरात, अक्षय शिंदे, सुभाष कारंडे, सुनील सवादी, कुमार धोंगडे,सतीश यादव,सचिन आल्हाट,हरिदास भिसे,वैष्णवी अवचिते,गजानन भोसले,गुणाजी मोरे, सुभाष कारंडे,शाईन आत्तार,मुकेश गायकवाड,अविनाश भाकरे,अनिल धुमाळ,ऋषिकेश मारणे,श्रीकांत भिसे,शितल कांडेलकर,सुरज सोनवणे,तगतसिंग तवर,अँन अनिश,सागर झा,संजय कोणे,फेबियन सॅमसंग,अरुण केदारी,संतोष काळे,प्रशांत कांबळे,निखिल खंदारे, निलेश रावडे आदी उपस्थित होते.

आम आदमी पार्टी, पुणे


 Give Feedback



 जाहिराती