पुणे : सोशल मीडियावर आपल्या साध्या, निरागस आणि प्रेमळ स्वभावाने लाखो लोकांच्या मनात घर करणाऱ्या जगदाळे आज्जी यांचे काल वृद्धापकाळाने निधन झाले. काही दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते.नातू महेश जगदाळे याच्यासोबत केलेल्या व्हिडिओंमधून जगदाळे आज्जी घराघरात पोहोचल्या. त्यांच्या सहज हास्याने, साध्या बोलण्याने आणि मायेच्या शब्दांनी त्या अल्पावधीतच सोशल मीडियावर लोकप्रिय झाल्या. त्या केवळ एक सोशल मीडिया व्यक्तिमत्त्व न राहता, अनेकांसाठी आपल्या घरातल्याच आज्जीची आठवण बनल्या होत्या.जगदाळे आज्जींच्या निधनाचे वृत्त समजताच सोशल मीडियावर शोकभावना व्यक्त केल्या जात आहेत. अनेक चाहत्यांनी भावनिक पोस्ट करत त्यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे.जगदाळे आज्जी आज आपल्यात नसल्या तरी त्यांनी दिलेला प्रेमाचा, मायेचा आणि हसण्याचा ठेवा कायम स्मरणात राहील, अशा भावना सर्वत्र व्यक्त होत आहेत