सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मोठी राजकीय घडामोड : राष्ट्रवादीचं अध्यक्षपद पवार कुटुंबातच राहणार? सुनेत्रा पवारांच्या नावाची जोरदार चर्चा
  • मोठी बातमी! राज्य सरकारकडून अजित पवारांच्या विमान अपघाताच्या सीआयडी चौकशीचे आदेश; एक्सिडेंटल डेथ रिपोर्टच्या अनुषंगानेही तपास
  • जिल्हा परिषद व पंचायत समित्यांसाठी ५ ऐवजी ७ फेब्रुवारी रोजी मतदान; ९ फेब्रुवारी २०२६ रोजी मतमोजणी
  • शरद पवारांनी घेतलं अजित पवारांच्या अस्थींचं दर्शन; विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात आजही मोठी गर्दी
 शहर

प्रभाग क्र.३४ मधील वडगाव बुद्रुक परिसरात रस्ते व ड्रेनेज संदर्भातील विविध विकासकामांची नगरसेवक हरिदास चरवड यांनी केली सखोल पाहणी.

गजानन मेनकुदळे    06-02-2026 17:49:22

पुणे : प्रभाग क्रमांक ३४ मधील वडगाव बुद्रुक परिसरात रस्ते व ड्रेनेज संदर्भातील विविध विकासकामांची सखोल पाहणी नगरसेवक हरिदास चरवड यांनी आज केली. या पाहणीदरम्यान पुणे महानगरपालिकेचे अधिकारी सुर्वे साहेब, देशमुख साहेब व अमर जाधव उपस्थित होते

परिसरातील अंतर्गत रस्त्यांची अवस्था, पावसाळ्यात होणारी पाणी साचण्याची समस्या तसेच ड्रेनेज व्यवस्थेतील त्रुटी यांचा आढावा यावेळी घेण्यात आला. नगरसेवक हरिदास चरवड यांनी नागरिकांशी थेट संवाद साधत त्यांच्या समस्या, सूचना व अपेक्षा जाणून घेतल्या. अनेक ठिकाणी वाहतुकीस अडथळे निर्माण होत असल्याने त्यावर तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

स्थानिक नागरिकांच्या गरजा, सध्याची वाहतूक परिस्थिती तसेच भविष्यातील लोकसंख्या वाढ लक्षात घेऊन विकासकामांचे नियोजन करण्यात येत आहे. रस्ते व ड्रेनेजची कामे दर्जेदार, टिकाऊ आणि वेळेत पूर्ण करण्यावर भर देण्यात येणार असल्याचे चरवड यांनी यावेळी सांगितले.

परिसरातील पायाभूत सुविधा अधिक सक्षम करून नागरिकांना सुरक्षित, सुलभ व सोयीस्कर दळणवळण व्यवस्था उपलब्ध करून देण्याचा आपला प्रयत्न असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.


 Give Feedback



 जाहिराती