सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मोठी राजकीय घडामोड : राष्ट्रवादीचं अध्यक्षपद पवार कुटुंबातच राहणार? सुनेत्रा पवारांच्या नावाची जोरदार चर्चा
  • मोठी बातमी! राज्य सरकारकडून अजित पवारांच्या विमान अपघाताच्या सीआयडी चौकशीचे आदेश; एक्सिडेंटल डेथ रिपोर्टच्या अनुषंगानेही तपास
  • जिल्हा परिषद व पंचायत समित्यांसाठी ५ ऐवजी ७ फेब्रुवारी रोजी मतदान; ९ फेब्रुवारी २०२६ रोजी मतमोजणी
  • शरद पवारांनी घेतलं अजित पवारांच्या अस्थींचं दर्शन; विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात आजही मोठी गर्दी
 जिल्हा

धाराशिव चे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी गोवर्धनवाडी येथे सपत्नीक बजावला मतदानाचा हक्क

गजानन मेनकुदळे    07-02-2026 12:20:44

धाराशिव : धाराशिव जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोकशाहीचा उत्सव सर्वत्र उत्साहात साजरा होत असताना, धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी आज गोवर्धनवाडी येथे सपत्नीक आपला मतदानाचा हक्क बजावला.मतदानानंतर खासदार निंबाळकर यांनी लोकशाहीतील मतदानाच्या महत्त्वावर भर देत सांगितले की, “लोकशाहीत मतदान हा सर्वात महत्त्वाचा आणि मौल्यवान अधिकार आहे. प्रत्येक नागरिकाने कोणताही अपवाद न करता आपला मतदानाचा हक्क बजावणे अत्यंत आवश्यक आहे.”तसेच त्यांनी सर्व मतदारांना नम्र आवाहन करत सांगितले की, “आपण सर्वांनी मतदान प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेऊन लोकशाही अधिक बळकट करावी.”खासदार ओमराज निंबाळकर यांनी स्वतः मतदान करून जबाबदार नागरिकत्वाचे उदाहरण घालून दिले असून, त्यांच्या या कृतीमुळे मतदारांमध्ये सकारात्मक संदेश गेला आहे.जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर नागरिकांनी सहभागी होऊन लोकशाहीचा हा उत्सव यशस्वी करावा, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.


 Give Feedback



 जाहिराती