मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांना घडविण्यात राष्ट्रमाता जिजाऊ सारखी दुरदुष्टी आजच्या सर्व मातानी ठेवली तर आमच्या ही घराघरात छत्रपती शिवाजी महाराजा सारखे शूरवीर निर्माण होतील. राष्ट्रमाता जिजाऊ ही इतिहास घडविणारी एक महान स्त्री झाली होती.स्वराज्य निर्माण करण्यासाठी गोरगरिब, शेतकऱ्यावर विविध जाती धर्माच्या मराठी मावळ्यांवर दया दाखविणारी कारूण्यमूर्ती होती. त्यामुळेच शिवाजी महाराजाच्या कृतीतून कार्य सिद्धीस नेण्यासाठी लागणारी प्रेरणा मूर्ती जिजामाता होती.राष्ट्रमाता राजमाता जिजाऊची जन्मभूमी सिंदखेड राजा बुलढाणा जिल्हा जागतिक कीर्तीचे पर्यटन स्थळ झाले नाही.
बुलढाणा जिल्हयाचा विकास होण्यासाठी दळण वळणाची साधने कायमस्वरूपी हवी आहेत.सिंदखेड राजा आणि लोणार सरोवर ही दोन्ही जागतिक कीर्तीचे पर्यटन स्थळ होऊ शकतात.हजारो लोकांना रोजगार उपलब्ध होऊ शकतो. पर्यटकांना येण्या जाण्यासाठी जलद सेवा म्हणजे रेल्वे, राहण्यासाठी हॉटेल लॉजिग ची व्यवस्था झाल्यास मोठ्या प्रमाणात लोक या दोन प्रमुख ठिकाणी भेटी दिल्या शिवाय राहणार नाहीत. ऐतीहासिक इतिहास असणाऱ्या या स्थळानां जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आले आहे.विज्ञानवादी दुष्टिकोण ठेऊन काम केल्यास बुलढाणा जिल्हा हा जागतिक कीर्तीचे पर्यटन स्थळ होऊ शकते.बुलढाणा जिल्ह्याचा आर्थिक विकास होण्याच्या दुष्टिने पर्यटनासाठी दोन नवीन रेल्वे लाईन ची गरज आहे. त्यासाठी जिल्ह्यातील सर्व समाजाच्या लोकांनी आणि राजकर्त्यानी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी जनजागृती करून जन आंदोलन केले पाहिजे. सतत पत्रव्यवहार विनंती अर्ज,निवेदने दिली पाहिजेत.तरच राज्य व केंद्र सरकार याकडे गांभीर्याने पाहू शकते.
पश्चिम विदर्भातील बुलढाणा जिल्हा हा ऐतिहासिक दृष्टया अत्यंत संपन्न व महत्वाचा जिल्हा आहे.परंतु हा जिल्हा आर्थिक आणि सामाजिक दृष्टया अत्यंत मागासलेला आहे. या जिल्हयाचा विकास खालील दोन मांगण्या मान्य केल्या तर हमखास होऊ शकतो.
1) पर्यटनाद्वारे विकास:-या जिल्ह्यात महाराष्ट्राचे वैभव छत्रपती शिवाजी महाराज यांचे आजोळ म्हणजेच राष्ट्रमाता जिजाऊंचे जन्म स्थान सिंदखेड राजा आहे.हे अत्यंत अत्यंत महत्वाचे ऐतिहासिक स्थळ महाराष्ट्र शासनाने पर्यटन स्थळ म्हणून अनेक वर्षांपूर्वी घोषित केलेले आहे.तरीही प्रगती नगन्य आहे.तसेच सिंदखेड राजा पासुन अंदाजे ६५ कि.मी.अंतरावर लोणार हे जागतिक कीर्तिचे उल्कापात अन्वये निर्मित खारे पाणी असलेले खूप मोठे विहंगम सरोवर आहे.जगातील शास्त्रज्ञांना भुरळ घालणारे असे हे दुसरे पर्यटन केन्द्र.शासनाने अनेक वर्षांपासुन घोषीत केलेले आहे.ही पर्यटनाची दोन्ही ठिकाणे जवळ जवळ आहेत.किती दुर्मीळ अनमोल असा ठेवा या बुलढाणा जिल्हयास लाभलेला आहे.महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यात असलेले लोणार सरोवर (Lonar Lake) हे उल्कापातामुळे निर्माण झालेले जगातील एकमेव 'हायपर-व्हेलोसिटी इम्पॅक्ट क्रेटर' (खाऱ्या पाण्याचे विवर) असून, ते एक अधिसूचित राष्ट्रीय भू-वारसा स्मारक आहे.अंदाजे ५ लाख ७० हजार वर्षांपूर्वी निर्माण झालेल्या या सरोवराचा व्यास सुमारे १.२ किमी आहे, जे त्याच्या खऱ्या, क्षारीय (Alkaline) पाण्यामुळे आणि अद्वितीय जैवविविधतेसाठी ओळखले जाते.परंतु अज्ञान अंधश्रद्धा पळणाऱ्या लोककडून याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे हा भाग सर्व द्रुष्टीने खूप खूप मागासलेला राहीलेला आहे.
येण्याजण्याची आणि राहण्याची उत्तम व्यवस्था नसल्यामुळे पर्यटक देखील ईकडे फिरकत नाहीत.आणि चुकून आलेच तर परत कधीही येणार नाही असे संबोधुन उद्विग्न होउन निघुन जातात.कारण येथे पर्यटकांना सुविधा नाहीत.व्यापार उदीम,आर्थिक उलाढाल लाखों करोडो रुपयाची होऊ शकते.अशी ही लोणार व सिंदखेड राजा जागतिक किर्तीची गावे असतांना इथे मात्र ऊदासिनता,निराशा प्रचंड प्रमाणात निर्माण करण्यात आली आहे.येथील नागरिकांचा मुख्य व्यवसाय निसर्गाच्या लहरी पावसावर अवलंबून असणारी शेती आहे.याची स्थानिक रहिवाशांना पुर्ण कल्पना आहे.तरी जिल्ह्यातील उच्च सुशिक्षित लोक,शासन प्रशासनात नोकरी करणारे अधिकारी वर्ग सामाजिक बांधिलकी ठेऊन बुलढाणा जिल्ह्याचा आर्थिक विकासाच्या दुष्टिने विचार करत नाही.
विदर्भातील ही दोन महत्वाची पर्यटन व ऐतिहासिक स्थळे जीर्ण झालेली आहेत. पर्यटक आकर्षित होतील अशा योजना शासन आखते परंतु विकासाला गती मिळत नाही.कारण संबंधित मान्यवरांकडून पाठपुरावा प्राॅपर - बरोबर होत नाही.सिंदखेड राजा येथील काही ऐतिहासिक स्थळांची थोड्या प्रमाणात (10 टक्के) डागडुगजी झाली परंतु बाकी सर्व स्थळे आहेत तशीच जीर्ण आणि भकास अवस्थेत आहेत.तसेच पर्यटकांना कोणत्याही प्रकारच्या सुविधा येथे उपलब्ध नाहीत.या आणि अशा उदास, भकास व भयान स्मशान शांतता पसरलेल्या स्थळांकडे कोण फिरकणार? ही सत्य व विदारक परिस्थिती राजमाता जिजाऊं चे जन्म स्थान असलेल्या सिंदखेड राजाची आणि जागतिक कीर्ती असलेल्या लोणार सरोवर असलेल्या लोणार स्थानची आहे.
बुलढाणा जिल्हा भूमिपुत्रांनी बुद्धीचा व विज्ञानाचा वापर केला तर शासनाने लक्ष वेधून घेऊ शकतात.आणि यामुळे शासन या स्थळांचा सर्वागीन पर्यटन विकास घडवून आणु शकते. त्याच बरोबर स्थानिक रहिवाशांना मोठ्या प्रमाणात कायमस्वरूपी रोजगारांची संधी उपलब्ध होऊ शकते. यावरील सर्व विचारांने प्रेरित होऊन प्रशासकीय सेवेतील सेवानिवृत बुलढाणा जिल्हा भूमिपुत्रांनी आपल्या प्रशासकीय अनुभवा नुसार शासनाकडे मागणीची नियोजन बद्ध योजना (प्लॅन) तयार केला आहे.कृपया बुलढाणा जिल्ह्यातील सर्व लोकांनी त्याचे बारकाईने अवलोकन करावे.
नियोजन बद्ध योजना (प्लॅन) - दोन नवीन रेल्वे लाइन्स उभारून जिल्हयाचा विकास साध्य करता येईल.
पश्चिम महाराष्ट्र,मराठवाड़ा आणि देशातील इतर ऐतिहासिक स्थळे उदाहरण पुणे,छत्रपती संभाजी नगर,आग्रा,दिल्ली आणि आसपासची अनेक छोटी छोटी शहरे रेलवे मार्गाने जोडलेली आहेत म्हणून पर्यटक वरील ठिकाणी हजारो लाखो च्या संखेने भेट देतात.त्यामुळे तेथील नागरिकांना आपल्या उदरनिर्वाहा साठी प्रचंड प्रमाणात रोजगार मिळतो. बुलडाणा जिल्ह्यातील या भागात रेल्वे लाईन नाही त्यामुळे पर्यटक ईच्छा असुन सुद्धा फिरकत नाहीत.पर्यायाने पर्यटनाद्वारे मिळणारा रोजगार उपलब्ध होत नाही.यास्तव बुलढाणा जिल्ह्यातील नागरिकांची आवर्जून अशी मागणी आहे की शासनाने खालील रेल्वे मार्ग नव्याने निर्माण करावेत आणि बुलढाणा जिल्ह्यावर सतत होणाऱ्या आर्थिक विकासाच्या अन्यायापासुन कायमची मुक्तता करावी.
1.जालना ते नागपुर व्हाया सिंदखेड राजा,राहेरी,किनगाव राजा,दुसरबीड,लोणार, सुलतानपुर,मेहकर,डोणगाव.......पुढे नागपूर.या रेल्वे रूट ची उभारणी करावी.यामुळे अजिंठा,वेरूळ येथे आलेल्या पर्यटकास जागतिक कीर्तिचे व ऐतिहासिक स्थळ लोणार येथे भेट देता येत येईल. कारण तेथे रेल्वे चा रूट नाही.हा रेल्वे रूट झाला तर हजारो पर्यटक या दोन्ही ठिकाणी आकर्षिले जातील.शासनास मिळणाऱ्या महसुलात तर प्रचंड वाढ होईलच परंतु स्थानीक व आसपासच्या नागरिकांना रोजगार उपलब्ध होईल. शेतकऱ्यांच्या मालाला शहराशी जोडल्या जाईल. व नागरिकांच्या आर्थिक प्रगतीस फार मोठा हातभार लागेल.
2.तसेच दुसरी रेल्वे लाईन जालना ते खामगांव ही फार जुनी मागणी शासनाने अद्याप कार्यान्वीत वा मान्य केलेली नाही ती मागणी देखील शासनाने मान्य करून युद्ध पातळीवर कामे करून हा रेल्वे रूट पुर्ण करावा.
एक विषेश बाब म्हणून संभावित रेल्वे स्टेशन सिंदखेड राजा हे दोन्ही रेल्वे रूट साठी रेल्वे जंक्शन असावे ही आमची रेल्वे संबंधी प्रमुख मागणी आहे.
बुलढाणा जिल्हा रहिवाशी भूमिपुत्रांनो आपण तर या मातीशी निगडित आहात. आम्हास आशा आहे की आपण या आमच्या दोन मागण्या शासनाकडे सतत पाठपुरावा करून मनापासून मांडल्या तर आपल्या या मागास बुलढाणा जिल्ह्याचा आर्थिक विकास घडून आणता येईल.आपण याकडे स्वत: जातीने लक्ष दिले तरच जनजागृती केली तरच ही दोन्ही कामे पुर्ण होतील.याची आम्हाला शंभर टक्के खात्री वाटते.यासाठी नागरिकांस व शासनास वेळोवेळी आठवण करून देण्यासाठी "बुलढाणा जिल्हा विकास संघर्ष समिती,मुंबई" सुकाणू समितीची स्थापना करण्यात आली आहे. त्यात प्रशासकीय सेवेतील सेवानिवृत बुलढाणा जिल्हा भूमिपुत्र आहेत.मान.व्ही जी जाधव,यु ओ बोदवडे,एच बी तायडे,डाॅ.व्ही बी तायडे,एम जे बोर्डे,एन बी म्हस्के,ई एम शिंदे,एस बी जाधव,डाॅ.डी आर इंगळे,प्रिं.बी बी पवार, ऍड.वामनराव मोरे,आर एस भालेराव,दिलीप भालेराव,पत्रकार साहित्यिक कामगार नेते सागर रामभाऊ तायडे आणि पुढे अनेक मान्यवर प्रशासकीय अधिकारी कर्मचारी,साहित्यिक,विचारवंत,सामाजिक कार्यकर्ते नेते सहभागी आहेत. आणखी आपण ही बुलढाणा जिल्हा मुंबई रहिवाशी भूमिपुत्र आणि बुलढाणा जिल्हा रहिवाशी भूमिपुत्र म्हणून सहभागी होतील असा सुकाणू समितीला विश्वास आहे. त्यासाठी मान.एन बी म्हस्के ९१३७०९४८४,आणि मान.व्ही जी जाधव ९९२०१०४०७९,बुलढाणा जिल्हा विकास संघर्ष समिती,मुंबई.सुकाणू समिती यांच्याशी संपर्क करावा.