सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मोठी राजकीय घडामोड : राष्ट्रवादीचं अध्यक्षपद पवार कुटुंबातच राहणार? सुनेत्रा पवारांच्या नावाची जोरदार चर्चा
  • मोठी बातमी! राज्य सरकारकडून अजित पवारांच्या विमान अपघाताच्या सीआयडी चौकशीचे आदेश; एक्सिडेंटल डेथ रिपोर्टच्या अनुषंगानेही तपास
  • जिल्हा परिषद व पंचायत समित्यांसाठी ५ ऐवजी ७ फेब्रुवारी रोजी मतदान; ९ फेब्रुवारी २०२६ रोजी मतमोजणी
  • शरद पवारांनी घेतलं अजित पवारांच्या अस्थींचं दर्शन; विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात आजही मोठी गर्दी
 जिल्हा

मुंबईत आरएसएस कार्यक्रमात सलमान खानची एन्ट्री; सगळ्यांचं लक्ष ‘भाईजान’कडे

डिजिटल पुणे    07-02-2026 17:09:16

मुंबई : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त शहरात दोन दिवसीय विशेष व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या पहिल्याच दिवशी बॉलीवूडचा सुपरस्टार सलमान खान उपस्थित राहिल्याने मोठी चर्चा रंगली.मुंबईतील नेहरू सेंटर येथे सुरू झालेल्या या कार्यक्रमाचे नाव ‘नवे क्षितिज’ असे ठेवण्यात आले आहे. संघाच्या वैचारिक भूमिकेवर आधारित व्याख्याने, चर्चासत्रे आणि सांस्कृतिक कार्यक्रम येथे होणार आहेत. उद्घाटन सोहळ्याला चित्रपटसृष्टीतील अनेक मान्यवर चेहरे उपस्थित होते.

दिग्दर्शक सुभाष घई, अभिनेते रणबीर कपूर, ज्येष्ठ अभिनेत्री हेमा मालिनी तसेच अश्विनी भावे यांसारख्या कलावंतांनी हजेरी लावली. मात्र, सलमान खान कार्यक्रमस्थळी पोहोचताच सर्वांचे लक्ष त्याच्याकडे वेधले गेले. कॅमेरे आणि उपस्थितांची गर्दी त्याच्याभोवती जमा झाल्याचे पाहायला मिळाले.या उपस्थितीमुळे सलमान खान हा या आरएसएस कार्यक्रमाचा सर्वात चर्चेचा विषय ठरला असून, त्याच्या सहभागामुळे कार्यक्रमाला वेगळेच ग्लॅमर मिळाल्याचे मानले जात आहे.


 Give Feedback



 जाहिराती