सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • कोणीतरी नेता सुनेत्रा काकींच्या खांद्यावर हात टाकतो, कोणीतरी ओढतो; रोहित पवारांचा राष्ट्रवादीतील 'चौकडी'वर हल्लाबोल
  • भारतीय क्रिकेटपटू रिंकू सिंहच्या वडिलांचे निधन, कर्करोगाशी झुंज अपयशी, नोएडातील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
  • तुम्ही नवे पर्व सुरु झालं म्हणता, पण अजितपर्व कधीच संपणार नाही, रोहित पवारांचा सुनील तटकरेंवर हल्लाबोल
  • दिल्लीतील मद्य घोटाळ्याप्रकरणी दिल्ली कोर्टातून निर्दोष मुक्तता, केजरीवाल हमसून रडले, म्हणाले, 'आम्ही नेहमी सांगायचो ...'
 विश्लेषण

मोठी बातमी: शरद पवार यांना खोकल्याचा त्रास; पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये तपासणी सुरू

डिजिटल पुणे    09-02-2026 16:05:47

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना रुग्णालयात तपासणीसाठी नेण्यात आलं आहे. दिवंगत नेते अजित पवार यांच्या निधनानंतर गेल्या काही दिवसांपासून ते आपल्या बारामती, मुंबई आणि पुण्यातील घरी दौरे करत होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांना अचानक खोकल्याचा त्रास जाणवू लागल्याने त्यांना पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून ते बारामती, मुंबई आणि पुणे येथे कौटुंबिक व राजकीय भेटीगाठींमध्ये व्यस्त होते. या काळात पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते त्यांची सातत्याने भेट घेत होते.आज सकाळपासून शरद पवार यांना खोकल्याचा त्रास जाणवू लागल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना रुबी हॉस्पिटलमध्ये नेले. त्यांच्यासोबत खासदार सुप्रिया सुळे उपस्थित आहेत.

रुबी हॉल क्लिनिकचे प्रमुख डॉक्टर परवेझ ग्रँट यांनी सांगितले की, सध्या शरद पवार यांची सविस्तर वैद्यकीय तपासणी सुरू आहे. सर्व चाचण्यांचे अहवाल आल्यानंतर त्यांना घरी पाठवायचे की निरीक्षणासाठी रुग्णालयात दाखल करायचे, याबाबत निर्णय घेतला जाईल.रुग्णालय प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, शरद पवार यांची प्रकृती सध्या स्थिर असून डॉक्टरांचे पथक त्यांच्यावर लक्ष ठेवून आहे. तपासणीनंतरच पुढील वैद्यकीय पावले उचलली जाणार आहेत.


 Give Feedback



 जाहिराती