सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मोठी राजकीय घडामोड : राष्ट्रवादीचं अध्यक्षपद पवार कुटुंबातच राहणार? सुनेत्रा पवारांच्या नावाची जोरदार चर्चा
  • मोठी बातमी! राज्य सरकारकडून अजित पवारांच्या विमान अपघाताच्या सीआयडी चौकशीचे आदेश; एक्सिडेंटल डेथ रिपोर्टच्या अनुषंगानेही तपास
  • जिल्हा परिषद व पंचायत समित्यांसाठी ५ ऐवजी ७ फेब्रुवारी रोजी मतदान; ९ फेब्रुवारी २०२६ रोजी मतमोजणी
  • शरद पवारांनी घेतलं अजित पवारांच्या अस्थींचं दर्शन; विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात आजही मोठी गर्दी
 राजकारण

भाजपला आत्मचिंतन करण्याची गरज;मतदारांनी भाजपला नाकारले ;निवडणुकीतून चित्र झाले स्पष्ट; महाविकास आघाडीचे सर्व घटक पक्ष एकत्र आल्याने झाला विजय

विठ्ठल ममताबादे ( प्रतिनिधी )    10-02-2026 11:16:58

उरण  : उरण मध्ये ४ जिल्हा परिषद व ८ पंचायत समिती सदस्य पदासाठी निवडणूक झाली असून ४ जिल्हा परिषद पैकी ३ जागा महाविकास आघाडीने जिंकल्या आहेत. तर ८ पंचायत समिती सदस्य पदा पैकी ७ जागा महाविकास आघाडीने जिंकल्या आहेत. जिल्हा परिषद व पंचायत समिती अशा मिळून १२ जागापैकी १० जागेवर महाविकास आघाडी निवडून आली आहे. भारतीय जनता पार्टीचा १ जिल्हा परिषद सदस्य व १ पंचायत समिती सदस्य निवडून आले आहेत.या निकालामूळे भारतीय जनता पार्टीला खूप मोठा धक्का बसला असून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी(श्री शरदचंद्र पवार गट ), शेतकरी कामगार पक्ष, शिवसेना (श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे गट), महाराष्ट्र नवनिर्माण सेना या घटक पक्षाचे मिळून उरण मध्ये महाविकास आघाडी तयार करण्यात आली. भाजपला प्रत्यूतर देण्यासाठी महाविकास आघाडी तयार करून नियोजन बद्ध प्रचार करण्यात आला त्यामुळे उरण मध्ये जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला सर्वाधिक जागेवर विजय मिळविता आला आहे.या  निवडणुकीत भाजपचा सुफडा साफ झाला आहे. मतदारांनी महाविकास आघाडीला स्पष्ट बहुमत दिले असून भाजप ला स्पष्ट पणे नाकारले आहे. या निवडणुकीमुळे भाजपला आत्मचिंतन करण्याची गरज निर्माण झाली आहे.

उरण तालुक्यात सुरवातीपासूनच महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असा अटी तटीचा सामना रंगला होता. उरण तालुक्यात भाजप विरुद्ध महाविकास आघाडी असे चित्र असल्यामुळे हेच चित्र निवडणुकीच्या निकालाच्या माध्यमातून दिसून आले. उरण मध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार सर्वाधिक मताने निवडून आले असून त्या नंतर भाजपच्या उमेदवारांचा नंबर लागतो.आमदारकीच्या निवडणुकीत आ. महेश बालदी यांना चांगली मते मिळाली असल्यामुळे तीच मते जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत मिळतील असा विश्वास भाजपच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना होता. मात्र त्यांचा हा अंदाज खोटा ठरला. मतदारांनी तो अंदाज खोटा ठरविला.उरण मध्ये महाविकास आघाडीने जोरदार मुसंडी मारली असून या निकाला वरून २०२९ चा आमदारकीचा उमेदवार हा महाविकास आघाडीचा असेल असा आशा तशा भावना महाविकास आघाडीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी बोलून दाखविल्या.

भाजपच्या अपयशाची कारणे :- 

1)फाजील आत्मविश्वास :- पदाधिकारी कार्यकर्त्यांना अति विश्वास होता कि कोणत्याही परिस्थितीत भाजपचेच उमेदवार निवडून येतील. जिल्हा परिषद व पंचायत समिती वर सत्ता आमचीच असेल या अविरभावात भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते होते.

2):- जनतेला गृहीत पकडले :- मतदार हा काहीही करून भाजपलाच मतदान करेल अशी विचार धारणा भाजपच्या पदाधिकारी कार्यकर्त्याची होती. नेहमी प्रमाणे याही जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत जनतेला गृहीत पकडल्याने भाजपचा मोठा पराभव पाहायला मिळाला.

3)योग्य उमेदवार नसणे :- भाजपने जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी योग्य उमेदवार न दिल्याने त्याचा जोरदार फटका भाजपला बसला आहे. पदाधिकारी कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन योग्य पात्रतेचे उमेदवार उभे केले असते तर विजय हा भाजपचा असता. मात्र तसे झाले नाही.

4)जनसंपर्क कमी पडणे :- मुळातच सर्वच पक्षाना निवडणुकीच्या प्रचारासाठी वेळ कमी पडला. कमी वेळेत जास्तीत जास्त प्रचार करून मतदार, नागरिक, ग्रामस्थ यांच्याशी उत्तम जनसंपर्क ठेवायला पाहिजे होते. पण भाजपच्या उमेदवार कडुन पाहिजे तसा प्रचार, जनसंपर्क झाले नाही.नियोजन बद्ध प्रचार भाजपला करता आले नाही. त्यामुळे भाजपला अपयश आले आहे.

5)आमदार महेश बालदी यांच्या नेतृत्वावर नाराजी :- भाजपचे विद्यमान आमदार महेश बालदी यांच्या नेतृत्वावर उरण मधील जनता नाखुष होती. उरणच्या जनतेला आमदार महेश बालदी यांचे नेतृत्व मान्य नसल्याने त्याचा फटका जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या भाजप तर्फे उभ्या असलेल्या उमेदवारांना बसला आहे.

उमेदवारांची नावे व त्यांना मिळालेली मते:- 

 चिरनेर जिल्हा परिषद 

ऍड अविनाश विजय ठाकूर (महाविकास आघाडी ) 14932

देवेंद्र विनायक पाटील (भाजप ) 11169 

संतोष श्याम गावंड (अपक्ष ) 156

अविनाश जयवंत पाटील (अपक्ष ) 104

रत्नाकर हरिश्चंद्र म्हात्रे (अपक्ष ) 88

NOTA (वरील पैकी एकही नाही )(नोटा) 354.

विजयी उमेदवार - ऍड अविनाश  ठाकूर

नवघर जिल्हा परिषद 

प्रेरणा कुणाल पाटील (महाविकास आघाडी )10617 

प्रभावती राजाराम भोईर (भाजप )6198 

सोनाली तुषार गायकवाड (वंचित बहुजन आघाडी ) 173 

NOTA (वरील पैकी एकही नाही )(नोटा) 449

विजयी उमेदवार - प्रेरणा कुणाल पाटील 

जासई जिल्हा परिषद 

जे डी जोशी (भाजप ):- 8811 

डॉ मनिष पाटील (महाविकास आघाडी )10803 

संतोष दत्तू भालेकर (अपक्ष )154 

NOTA (वरील पैकी एकही नाही (नोटा) 309 

विजयी उमेदवार - डॉ मनिष पाटील 

चाणजे जिल्हा परिषद 

सिद्धी सागर कडू (महाविकास आघाडी) - 8437 

रीना जितेंद्र घरत (भाजप )10069 

मालती संतोष भगत (आम आदमी पार्टी ) 273 

NOTA (वरील पैकी एकही नाही ) (नोटा ) 482

विजयी उमेदवार - रीना जितेंद्र घरत 

नवघर पंचायत समिती 

परेश धनाजी ठाकूर (महाविकास आघाडी )- 4341

ऍड. रजनीकांत गणेश पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी) 346 

हरेश गंगाधर भोईर (भाजप) 3968

NOTA (वरील पैकी एकही नाही )(नोटा ) 307 

विजयी उमेदवार - परेश धनाजी ठाकूर 

भेंडखळ पंचायत समिती 

कुंदा भूषण पाटील( माकप)686 

मिलिंद काशिनाथ पाटील (भाजप )3136

दिपक सुरेश भोईर (महाविकास आघाडी )4270 

भावेश भारत भोईर(शिवसेना )167 

शिवाजी यशवंत ठाकूर (अपक्ष )52 

NOTA (वरील पैकी एकही नाही )(नोटा ) 163 

विजयी उमेदवार - दिपक सुरेश भोईर 

जासई पंचायत समिती 

मनीषा बळीराम घरत (भाजप )4035

निर्मला नरेश घरत (महाविकास आघाडी )4165 

NOTA (वरील पैकी एकही नाही )(नोटा)180 

विजयी उमेदवार - निर्मला नरेश घरत 

चिर्ले पंचायत समिती 

ज्योस्त्ना अजित पाटील( भाजप) 5231 

प्रियांका दिपक मढवी (महाविकास आघाडी )6241

NOTA वरील पैकी एकही नाही (नोटा )225

विजयी उमेदवार - प्रियांका दिपक मढवी 

केगाव पंचायत समिती

परीक्षित प्रकाश ठाकूर( राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी )566

राजेंद्र आत्माराम ठाकूर (भाजप )3498

महेश महादेव म्हात्रे (महाविकास आघाडी )4035

NOTA (वरील पैकी एकही नाही (नोटा ) 154 

विजयी उमेदवार - महेश महादेव म्हात्रे 

 चाणजे पंचायत समिती 

कैलास मोरेश्वर भोईर (भाजप )4751 

अक्षय महेश म्हात्रे (शिवसेना )1620 

ऍड सागर सदानंद कडू(महाविकास आघाडी )- 4329

NOTA (वरील पैकी एकही नाही )(नोटा )308 

विजयी उमेदवार - कैलास मोरेश्वर भोईर 

चिरनेर पंचायत समिती 

कविता रूपेश पाटील (महाविकास आघाडी )8247 

साक्षी सुजित पाटील (भाजप) 5222 

NOTA (वरील पैकी एकही नाही )(नोटा )284

विजयी उमेदवार - कविता रुपेश पाटील 

आवरे पंचायत समिती 

सुषमा चंद्रकांत गावंड (मनसे )1076

समिधा निलेश म्हात्रे (भाजप )4249

प्रारंभी अविनाश गावंड  (महाविकास आघाडी )7414

NOTA (वरील पैकी एकही नाही )(नोटा )312 

विजयी उमेदवार - प्रारंभी अविनाश गावंड 


 Give Feedback



 जाहिराती