सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मोठी राजकीय घडामोड : राष्ट्रवादीचं अध्यक्षपद पवार कुटुंबातच राहणार? सुनेत्रा पवारांच्या नावाची जोरदार चर्चा
  • मोठी बातमी! राज्य सरकारकडून अजित पवारांच्या विमान अपघाताच्या सीआयडी चौकशीचे आदेश; एक्सिडेंटल डेथ रिपोर्टच्या अनुषंगानेही तपास
  • जिल्हा परिषद व पंचायत समित्यांसाठी ५ ऐवजी ७ फेब्रुवारी रोजी मतदान; ९ फेब्रुवारी २०२६ रोजी मतमोजणी
  • शरद पवारांनी घेतलं अजित पवारांच्या अस्थींचं दर्शन; विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात आजही मोठी गर्दी
 जिल्हा

कामठी येथे पोलिस उपायुक्त कार्यालयासाठी मेट्रो स्टेशनजवळ पर्याप्त जागेबाबत तत्काळ प्रस्ताव तयार करा – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

डिजिटल पुणे    10-02-2026 11:24:58

नागपूर : नागपूर शहरासह जवळील ग्रामीण भागापर्यंत मेट्रोचे सक्षम जाळे व सेवा सुविधा आपण निर्माण केल्या आहेत. लवकरच रामटेकच्यादिशेने कामठीसह कन्हानपर्यंतचा टप्पा मेट्रोशी जोडला जाणार आहे. या विस्तारात सुरक्षिततेच्यादृष्टीने योग्य ती सुविधा व कामठी येथे पोलिस उपायुक्त कार्यालयासाठी पर्याप्त पुरेशी जागा कशी उपलब्ध होऊ शकेल याबाबत प्रत्यक्ष पाहणी करुन तसा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश महसूलमंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जिल्हा प्रशासनाला दिले. सद्यास्थितीत ऑटोमोटीव्ह चौकापर्यंत मेट्रो धावत असून कामठीपर्यंतचे काम पूर्णत्वास येत आहे.

जिल्ह्यातील विविध विकास कामांबाबत पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जिल्हाधिकारी कार्यालय येथे बैठकीत आढावा घेतला. या बैठकीस आमदार कृष्णा खोपडे, महा मेट्रोचे महाव्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा पुनर्वसन अधिकारी मलिक विराणी, डब्ल्यूसीएलचे वरीष्ठ अधिकारी, उपविभागीय अधिकारी वंदना सवरंगपते, संजय पवार व वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते.

वेणा प्रकल्पासाठी संपादीत झालेल्या जमिनीचे मूळ मालकांना हस्तांतरण कायद्याच्या चौकटीत झाले का हे तपासून योग्य तो न्यायनिवाडा करणे क्रमप्राप्त आहे. याबाबत जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात येऊन याबाबत आहे ती वस्तुस्थिती समितीने सादर करण्याचे निर्देश त्यांनी दिले. मौजा सुराबर्डी येथे पोलिस महासंचालनालय नक्षल विरोधी पथक यांना आवंटीत करण्यात आलेल्या शासकीय जमिनीचा नकाशा दुरुस्ती व रेखांकन करुन देण्याबाबत पालकमंत्री श्री.बावनकुळे यांनी निर्देश दिले. याचबरोबर झुडपी जंगलाच्या प्रश्नाचे सोडवणूक न्यायलीन आदेशान्वये तत्काळ करावी असे आदेश त्यांनी जिल्हा प्रशासनाला दिले.


 Give Feedback



 जाहिराती