पुणे: नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा आयोजित 'भारत रंग महोत्सव 'साठी 'सियावर रामचंद्र की जय' या हिंदी बाल महा नाट्यप्रयोगाची निवड झाली आहे. १६ फेब्रुवारी २०२६ रोजी हा प्रयोग दिल्ली येथे होणार आहे. यात ७५ बाल कलाकारांनी भारतीय संस्कृतीचा आणि नाट्यपरंपरेचा ठसा अभिनयाद्वारे उमटवला आहे.याचे लेखन, दिग्दर्शन, निर्मिती श्रीमती राधिका देशपांडे यांची आहे.संगीत प्रशांत फागे,गीत डॉ. प्रसन्न शेंबेकर, महेंद्र वाघ,प्रकाश योजना हर्षवर्धन पाठक,नेपथ्य महेश साळगावकर यांचे आहे.निर्मिती प्रमुख राधिका दारवेकर असून विशेष मार्गदर्शन संजय पेंडसे, शामराव जोशी, प्रकाश पाठक यांचे आहे.