सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मोठी राजकीय घडामोड : राष्ट्रवादीचं अध्यक्षपद पवार कुटुंबातच राहणार? सुनेत्रा पवारांच्या नावाची जोरदार चर्चा
  • मोठी बातमी! राज्य सरकारकडून अजित पवारांच्या विमान अपघाताच्या सीआयडी चौकशीचे आदेश; एक्सिडेंटल डेथ रिपोर्टच्या अनुषंगानेही तपास
  • जिल्हा परिषद व पंचायत समित्यांसाठी ५ ऐवजी ७ फेब्रुवारी रोजी मतदान; ९ फेब्रुवारी २०२६ रोजी मतमोजणी
  • शरद पवारांनी घेतलं अजित पवारांच्या अस्थींचं दर्शन; विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात आजही मोठी गर्दी
 शहर

पोलिसांची धडक कारवाई; बुधवार पेठेत कॉम्बिंग ऑपरेशन, ५० हून अधिक घरांची झाडाझडती

डिजिटल पुणे    11-02-2026 12:51:20

 पुणे : बुधवार पेठ परिसरात पुणे पोलिसांनी मध्यरात्री धडक कॉम्बिंग ऑपरेशन राबवत मोठी कारवाई केली. रात्री १२ ते पहाटे ३ वाजेपर्यंत चाललेल्या या विशेष मोहिमेत ५० हून अधिक घरांची झाडाझडती घेण्यात आली.फरासखाना पोलीस ठाण्यातील एका महिला कर्मचाऱ्याला निलंबित केल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने ही कारवाई करण्याचा निर्णय घेतला. बेकायदा वास्तव्य करणाऱ्या एका बांगलादेशी तरुणीप्रकरणी योग्य ती माहिती न दिल्याचा आणि आर्थिक व्यवहार केल्याचा आरोप संबंधित कर्मचाऱ्यावर ठेवण्यात आला आहे.

या पार्श्वभूमीवर स्थानिक पोलीस आणि गुन्हे शाखेच्या विविध पथकांनी बुधवार पेठेतील प्रत्येक गल्लीत कडेकोट बंदोबस्त ठेवत नाकाबंदी केली. परिसरातील ये-जा करणाऱ्या सर्व प्रमुख रस्त्यांवर तपासणी करण्यात आली.शुक्रवार पेठ पोलीस चौकी परिसरातील कुंटणखान्यांमध्ये महिला पोलिसांनी सखोल चौकशी केली. वेश्याव्यवसायासाठी आलेल्या काही व्यक्तींना ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली.

अमली पदार्थांचा वापर, अल्पवयीन मुलींना जबरदस्तीने वेश्याव्यवसायात ढकलणे तसेच बांगलादेशी नागरिकांचे बेकायदा वास्तव्य या मुद्द्यांवर पोलिसांनी विशेष लक्ष केंद्रित केले होते. अनेक संशयितांची कसून चौकशी करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.


 Give Feedback



 जाहिराती