सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मोठी राजकीय घडामोड : राष्ट्रवादीचं अध्यक्षपद पवार कुटुंबातच राहणार? सुनेत्रा पवारांच्या नावाची जोरदार चर्चा
  • मोठी बातमी! राज्य सरकारकडून अजित पवारांच्या विमान अपघाताच्या सीआयडी चौकशीचे आदेश; एक्सिडेंटल डेथ रिपोर्टच्या अनुषंगानेही तपास
  • जिल्हा परिषद व पंचायत समित्यांसाठी ५ ऐवजी ७ फेब्रुवारी रोजी मतदान; ९ फेब्रुवारी २०२६ रोजी मतमोजणी
  • शरद पवारांनी घेतलं अजित पवारांच्या अस्थींचं दर्शन; विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात आजही मोठी गर्दी
 DIGITAL PUNE NEWS

32 विमा कंपन्यांतर्गत रोकडविरहित उपचार सुविधेसाठी अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेचा जनरल इन्शुरन्स कौन्सिलसोबत ऐतिहासिक सामंजस्य करार

डिजिटल पुणे    11-02-2026 14:15:26

नवी दिल्ली : नवी दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेने (AIIA) मुख्य प्रवाहातील आरोग्य विमा परिसंस्थेत आयुर्वेदाचे स्थान बळकट करण्याच्या दिशेने एक महत्वाचे ऐतिहासिक पाऊल टाकले आहे. संस्थेने आज दि. 10 फेब्रुवारी 2026 रोजी जनरल इन्शुरन्स कौन्सिल (GIC) सोबत एक सामायिक नोंदणी सामंजस्य करार केला.

अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेचे संचालक प्राध्यापक (वैद्य) पी. के. प्रजापती आणि जनरल इन्शुरन्स कौन्सिलचे आरोग्य संचालक सेगर संपतकुमार यांनी, आयुष आरोग्य विमा तज्ञ कोअर ग्रुपचे अध्यक्ष प्राध्यापक बेजोन कुमार मिश्रा यांच्या प्रमुख उपस्थितीत या करारावर स्वाक्षऱ्या केल्या.

अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेचे संचालक प्राध्यापक (वैद्य) पी. के. प्रजापती यांनी यावेळी उपस्थितांशी संवाद साधला. या करारावर स्वाक्षरी झाल्यामुळे अखिल भारतीय आयुर्वेद संस्था आता जनरल इन्शुरन्स कौन्सिल अंतर्गत असलेल्या सर्व 32 विमा कंपन्यांच्या पॅनेलवर नोंदणीकृत संस्था बनली आहे असे त्यांनी सांगितले. यामुळे रुग्णांना रोखविरहित (Cashless) उपचार सेवा पुरवणे शक्य होणार आहे. या महत्त्वाच्या घडामोडीबद्दल त्यांनी आयुष मंत्रालय आणि त्यांच्या कार्यकारी पथकाचे आभार मानले. यामुळे उपक्रमाचा मोठ्या प्रमाणावर रुग्णांना फायदा होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.या उपक्रमामुळे रुग्णांचा आयुर्वेदिक उपचार घेण्याकडचा ओघ वाढेल, आणि त्यासोबतच सेवांचा अधिक वापर आणि संस्थेच्या शाश्वत प्रगतीसाठीही मदत होणार आहे.

महत्त्वाची घोषणा

यावेळी आयुष आरोग्य विमा तज्ञ कोअर ग्रुपचे अध्यक्ष प्राध्यापक बेजोन कुमार मिश्रा यांनी आयुष मंत्रालयाच्या एका मोठ्या उपक्रमाची घोषणा केली. याअंतर्गत आयुष उपचारांशी संबंधित विमाविषयक शंकांचे निरसन करण्यासाठीच्या एका समर्पित मदत व्यवस्थेचा (Support system) प्रारंभ करण्यात आला.

आयुष मंत्रालयाने देशात पहिल्यांदाच आयुष आरोग्य विमा हेल्पलाइन सुरू केली आहे :

मदत क्रमांक: 1800-11-0008

वेळ: सर्व कामकाजाच्या दिवशी सकाळी 9:30 ते संध्याकाळी 5:00 पर्यंत

लाभार्थ्यांना विमाविषयक समस्या सोडवण्यात मदत करणे, आयुष विमा संरक्षणाबाबत जागरूकता वाढवणे आणि पात्र लाभ सुलभतेने उपलब्ध करून देणे हा या मदत क्रमांकाचा उद्देश आहे.


 Give Feedback



 जाहिराती