पुणे : महाशिवरात्रि पर्वानिमित्त ब्रह्माकुमारीज यांच्या वतीने “सहस्र शिवलिंग दर्शन” आणि आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. सहस्र शिवलिंग चे दर्शन १४ व १५ फेब्रुवारी रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ८ वाजेपर्यंत ब्रह्माकुमारीज सेंटर, रायकर फार्म हाऊस, बाणेर येधे घेता येणार आहे.
महाशिवरात्रिच्या दिवशी आरोग्य शिबीराचे ही आयोजन करण्यात आले असून दुपारी ३ ते ४ या वेळेत डॉ. मंगेश (नाडी चिकित्सक) यांचे मार्गदर्शन सत्र होणार आहे. तसेच सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत सर्व रोगांची विनामूल्य तपासणी करण्यात येणार आहे. याशिवाय सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
आध्यात्मिक वातावरणात शिवभक्तांना सहस्र शिवलिंगांचे दर्शन घेण्याची संधी उपलब्ध होणार असून, समाजहिताच्या उपक्रमांमुळे या कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. आयोजकांनी सर्व नागरिकांनी उपस्थित राहून दर्शनाचा लाभ घ्यावा, तसेच रक्तदान व आरोग्य तपासणी उपक्रमात सहभाग नोंदवावा, असे आवाहन केले आहे.