सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मोठी राजकीय घडामोड : राष्ट्रवादीचं अध्यक्षपद पवार कुटुंबातच राहणार? सुनेत्रा पवारांच्या नावाची जोरदार चर्चा
  • मोठी बातमी! राज्य सरकारकडून अजित पवारांच्या विमान अपघाताच्या सीआयडी चौकशीचे आदेश; एक्सिडेंटल डेथ रिपोर्टच्या अनुषंगानेही तपास
  • जिल्हा परिषद व पंचायत समित्यांसाठी ५ ऐवजी ७ फेब्रुवारी रोजी मतदान; ९ फेब्रुवारी २०२६ रोजी मतमोजणी
  • शरद पवारांनी घेतलं अजित पवारांच्या अस्थींचं दर्शन; विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात आजही मोठी गर्दी
 विश्लेषण

भारतीय जनता पार्टीकडून पुणे महानगरपालिका स्थायी समितीसाठी १२ नगरसेवकांची नियुक्ती

गजानन मेनकुदळे    13-02-2026 16:28:52

पुणे : भारतीय जनता पार्टीने पुणे महानगरपालिकेच्या स्थायी समितीसाठी आपल्या १२ नगरसेवकांची नियुक्ती जाहीर केली आहे. आगामी आर्थिक वर्षातील विकासकामे, अर्थसंकल्पीय तरतुदी आणि विविध प्रकल्पांना गती देण्याच्या दृष्टीने ही नियुक्ती महत्त्वाची मानली जात आहे.

स्थायी समिती ही महापालिकेतील सर्वात प्रभावी समिती मानली जाते. महापालिकेचा अर्थसंकल्प तयार करणे, विविध विभागांच्या खर्चास मंजुरी देणे, निविदा प्रक्रियेवर देखरेख ठेवणे तसेच मोठ्या विकासकामांना अंतिम मान्यता देणे या समितीच्या अखत्यारीत येते. त्यामुळे या समितीतील सदस्यांची निवड राजकीयदृष्ट्या आणि प्रशासकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची ठरते.

भाजपकडून नियुक्त करण्यात आलेल्या नगरसेवकांमध्ये रूपाली धाडवे, कालिंदा पुंडे, जयश्री भुमकर, विशाल धनवडे, सातव रत्नमाला, प्राची आल्हाट, मयुरी कोकाटे, मानवतकर निशा, श्रीनाथ भिमाले, दादा कोद्रे, वृषाली कामठे आणि संदीप बेलदरे यांचा समावेश आहे.

पक्षाने अनुभवी तसेच नवोदित नगरसेवकांना संधी देत समतोल साधण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले जात आहे. शहरातील पायाभूत सुविधा, रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता आणि इतर नागरी सुविधांबाबत निर्णय प्रक्रियेला वेग देण्यासाठी ही नवी टीम प्रभावी ठरेल, असा विश्वास पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.दरम्यान, स्थायी समितीतील या नव्या रचनेमुळे महापालिकेतील राजकीय समीकरणांवरही परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आगामी काळात समितीच्या बैठकीत कोणते महत्त्वाचे निर्णय घेतले जातात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


 Give Feedback



 जाहिराती