सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मोठी राजकीय घडामोड : राष्ट्रवादीचं अध्यक्षपद पवार कुटुंबातच राहणार? सुनेत्रा पवारांच्या नावाची जोरदार चर्चा
  • मोठी बातमी! राज्य सरकारकडून अजित पवारांच्या विमान अपघाताच्या सीआयडी चौकशीचे आदेश; एक्सिडेंटल डेथ रिपोर्टच्या अनुषंगानेही तपास
  • जिल्हा परिषद व पंचायत समित्यांसाठी ५ ऐवजी ७ फेब्रुवारी रोजी मतदान; ९ फेब्रुवारी २०२६ रोजी मतमोजणी
  • शरद पवारांनी घेतलं अजित पवारांच्या अस्थींचं दर्शन; विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात आजही मोठी गर्दी
 विश्लेषण

बाबुरावजी घोलप महाविद्यालयात फ्युचॅरिस्टिक अँड्रॉइड डेव्हलपर विषयावर शॉर्ट टर्म कोर्

डिजिटल पुणे    14-02-2026 17:21:26

पुणे : आधुनिक विकास साधनांचा वापर करून मूलभूत अँड्रॉइड अनुप्रयोग डिझाइन विकसित करण्यासाठी आवश्यक ज्ञान आणि व्यावहारिक कौशल्ये विद्यार्थ्यांना प्रदान करणे, या उद्देशाने पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या सांगवी येथील बाबुरावजी घोलप महाविद्यालयातील संगणक शास्त्र विभागाच्या वतीने फ्युचॅरिस्टिक अँड्रॉइड डेव्हलपर विषयावर शॉर्ट टर्म कोर्सचे आयोजन करण्यात आले आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषद सदस्या व महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. संगीता जगताप यांच्या हस्ते या शॅार्ट टर्म कोर्सचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी संगणक शास्त्र विभाग प्रमुख डॉ. सीमा चौहान, कोर्स समन्वयक प्रा. चेतना पाटील, प्रा. निशिगंधा बागळे यांची प्रमुख उपस्थिती होती.


या शॅार्ट टर्म कोर्समध्ये इन्सटीट्युट ऑफ फ्युचॅरिस्टिक टेक्नॉलॉजी (IOFT) चे संचालक श्री. राहुल गुप्ता, श्री. सागर पाटकर, श्री. अविनाश यादव या संगणक क्षेत्रातील तज्ञ व्यक्तींनी वेब डेव्हलपमेंटमधील करिअरच्या संधी, मोबाइल अनुप्रयोग विकासामध्ये प्रगत शिक्षणासाठी आवश्यक कौशल्ये, इमर्सिव्ह ऑगमेंटेड आणि व्हर्च्युअल रिअलिटी अनुप्रयोग विकसित करणे, परस्परसंवादी 3D अनुभव डिझाइन करणे याविषयी सादरीकरणासह सविस्तर माहिती देत त्यांच्या ज्ञानात भर घातली.


या कोर्समध्ये एकूण १०८ विद्यार्थ्यांनी आपला सक्रिय सहभाग नोंदवला असून यशस्वीरित्या कोर्स पुर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्राचार्या, डॉ. संगीता जगताप, श्री. राहुल गुप्ता आणि डॉ. सीमा चौहान यांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. सदर कोर्सच्या संपूर्ण यशस्वीतेसाठी संगणक शास्त्र विभागातील प्रा. अर्चना सूर्यवंशी, प्रा. दिपाली शिंदे, प्रा. गायत्री जाधव, प्रा. योगिता पाटील, प्रा. काजल कांबळे, प्रा. ऋतुजा कदम, प्रा. श्रुती ओवेकर, प्रा. नेहा बारभाई, प्रा. सुचित्रा खडसे, प्रा. प्रीतम पगार, प्रा. रेश्मा कारभारी, प्रा. गायत्री पवार, दत्ता पोफळे, अनिल चांदेरे, राजू काटे, सचिन शितोळे यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.


 Give Feedback



 जाहिराती