सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मोठी बातमी! अजित दादांच्या निधनादिवशीच मंत्रालयात फाईलवर सह्या; राज्यभरातून संताप होताच मुख्यमंत्र्यांकडून स्थगिती
  • रोहित पवारांनी दिल्लीत खासगी गुप्तहेरांची भेट घेतली, दादांचा अपघात की घातपात, लवकरच सत्य समोर आणणार!
  • पुण्यात भाजप-काँग्रेस कार्यकर्त्यांत झटापट; जखमींची काळजी घेण्याचे हर्षवर्धन सपकाळ यांचे निर्देश
 विश्लेषण

रोहित पवार दिल्ली दौऱ्यावर; अजित पवार विमान दुर्घटनेमागील सत्य शोधण्यासाठी खासगी तपासाची तयारी

डिजिटल पुणे    16-02-2026 15:47:20

दिल्ली : राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेबाबत अजूनही स्पष्ट अहवाल समोर आलेला नसताना, शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी स्वतंत्र पातळीवर तपासाची हालचाल सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर ते सध्या दिल्लीत विविध तज्ज्ञांची भेट घेत असल्याची माहिती मिळत आहे.

काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषदेत रोहित पवार यांनी अजित पवार यांच्या विमान अपघातामागे घातपाताची शक्यता नाकारता येत नसल्याचे वक्तव्य केले होते. सरकारी तपास प्रक्रियेची गती मंद असल्याने त्यांनी स्वतः पुढाकार घेतल्याचे सांगितले जाते. सूत्रांच्या माहितीनुसार, दुर्घटनेचे खरे कारण शोधण्यासाठी खासगी गुप्तहेरांची मदत घेण्याचा निर्णयही त्यांनी घेतला आहे.

दरम्यान, अजित पवार यांच्या निधनाला २० दिवस उलटूनही नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाकडून (DGCA) प्राथमिक चौकशी अहवाल जाहीर झालेला नाही. तसेच संबंधित चार्टर सेवा देणाऱ्या कंपनीविरोधात ठोस कारवाई न झाल्याने संशय अधिक गडद होत असल्याचे रोहित पवार यांनी सोशल मीडियावर नमूद केले आहे. त्यांनी DGCA कडून तातडीने प्राथमिक अहवाल जाहीर करण्याची आणि संबंधित कंपनीवर योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली आहे.

२८ जानेवारी रोजी बारामती येथे निवडणूक प्रचारासाठी जात असताना अजित पवार यांच्या चार्टर्ड विमानाचा अपघात झाला होता. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून सकाळी उड्डाण केलेले हे विमान बारामती विमानतळाच्या धावपट्टीवर उतरण्याच्या आधीच शेतात कोसळले. दुर्घटनेनंतर विमानाला आग लागून भीषण स्फोट झाला आणि अजित पवार यांच्यासह एकूण पाच जणांचा मृत्यू झाला.

सध्या या दुर्घटनेचा तपास संबंधित यंत्रणांकडून सुरू असला तरी अधिकृत निष्कर्ष जाहीर होण्याची प्रतीक्षा कायम आहे. दरम्यान, रोहित पवार यांनी सुरू केलेल्या हालचालींमुळे या प्रकरणाला नवे वळण मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


 Give Feedback



 जाहिराती