सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मोठी बातमी! अजित दादांच्या निधनादिवशीच मंत्रालयात फाईलवर सह्या; राज्यभरातून संताप होताच मुख्यमंत्र्यांकडून स्थगिती
  • रोहित पवारांनी दिल्लीत खासगी गुप्तहेरांची भेट घेतली, दादांचा अपघात की घातपात, लवकरच सत्य समोर आणणार!
  • पुण्यात भाजप-काँग्रेस कार्यकर्त्यांत झटापट; जखमींची काळजी घेण्याचे हर्षवर्धन सपकाळ यांचे निर्देश
 जिल्हा

मुंबई महापालिका हद्दीतील अतिक्रमणांसंदर्भातील कार्यवाहीचा अहवाल आठ दिवसांत सादर करा – सभापती प्रा. राम शिंदे

डिजिटल पुणे    17-02-2026 11:58:16

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील शासकीय आणि खासगी जमीनींवर अनधिकृत बांधकाम संदर्भात कार्यवाहीचा अहवाल आठ दिवसाच्या आत सादर करण्यात यावा, असे निर्देश विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे यांनी दिले.विधानपरिषदेचे सदस्य सचिन अहिर यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधीच्या अनुषंगाने विधानभवनात बैठक झाली. बैठकीस आमदार सचिन अहिर, आमदार मनोज जामसूदकर, मुंबई महापालिका अतिरिक्त आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे, नगरविकास विभागाच्या सह सचिव विद्या हम्पय्या, विधानमंडळाचे सह सचिव राजेश तारवी आणि अन्य संबंधित अधिकारी उपस्थित होते.

मुंबई महानगर क्षेत्रात अतिक्रमणांबाबत कार्यवाही होणे गरजेचे असल्याचे आमदार  सचिन अहिर यांनी सांगितले.यासंदर्भात निवृत्त न्यायाधिशांच्या अध्यक्षतेखाली विशेष चौकशी पथक नेमण्याबाबतची कार्यवाही अंतिम टप्प्यात असल्याची माहिती यावेळी विभागातर्फे देण्यात आली.तातडीने कार्यवाही पूर्ण करुन येत्या आठ दिवसात यासंदर्भातील अहवाल सादर करण्याचे निर्देश सभापती प्रा. राम शिंदे यांनी यावेळी दिले.


 Give Feedback



 जाहिराती