पुणे: बकलीवाल ट्युटोरियल्स (BT) ने जेईई मेन २०२६ (सेशन १ – जानेवारी) मध्ये आपला आतापर्यंतचा सर्वोत्तम निकाल नोंदवत पुन्हा एकदा शैक्षणिक नेतृत्व सिद्ध केले आहे. यंदाचा निकाल हा उच्च पर्सेंटाइल मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येच्या दृष्टीने विक्रमी ठरला आहे.
उत्कृष्टतेची परंपरा कायम राखत BT ने यावर्षी घवघवीत यश संपादन केले आहे:
निकाल ठळक वैशिष्ट्ये:
९९.९ पर्सेंटाइलपेक्षा जास्त – २० विद्यार्थी
९९.५ पर्सेंटाइलपेक्षा जास्त – १११ विद्यार्थी
९९ पर्सेंटाइलपेक्षा जास्त – १९२ विद्यार्थी
दरवर्षीप्रमाणे यंदाही पुण्यात ९९, ९९.५ आणि ९९.९+ पर्सेंटाइल मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची सर्वाधिक संख्या BT चीच असून ती इतरांपेक्षा मोठ्या फरकाने आघाडीवर आहे. हा निकाल BT च्या सक्षम शैक्षणिक पद्धती, नियोजित अध्यापन, कठोर टेस्ट सिरीज, वैयक्तिक मार्गदर्शन आणि शिस्तबद्ध अंमलबजावणीचे द्योतक आहे.
९९.९५+ पर्सेंटाइल मिळवणारे BT पुणेचे विद्यार्थी
९९.९५ पर्सेंटाइलचा मानाचा टप्पा पार करणाऱ्या विद्यार्थ्यांचा विशेष गौरव:
सिद्धार्थ आठल्ये – ९९.९८६४

अतेन पंचबुधे – ९९.९८५७
अवनीश खोलकर – ९९.९७८७

आरुष कुमार – ९९.९७७३
आयुष निरंकारी – ९९.९७३९
आदित्य ठाकूर – ९९.९७३४
रायन आनंद – ९९.९६५४
चिन्मय गोखले – ९९.९५२८
निकालाची पडताळणी अद्याप सुरू असून ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे.बकलीवाल ट्युटोरियल्सचे चेअरमन व व्यवस्थापकीय संचालक श्री. वैभव बकलीवाल यांनी सर्व विद्यार्थी, पालक व शिक्षकांचे मनःपूर्वक अभिनंदन केले असून सेशन २ आणि जेईई अॅडव्हान्ससाठी अधिक जोमाने तयारी करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.BT मध्ये उत्कृष्टता ही अपवाद नसून परंपरा आहे.