सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मोठी बातमी! अजित दादांच्या निधनादिवशीच मंत्रालयात फाईलवर सह्या; राज्यभरातून संताप होताच मुख्यमंत्र्यांकडून स्थगिती
  • रोहित पवारांनी दिल्लीत खासगी गुप्तहेरांची भेट घेतली, दादांचा अपघात की घातपात, लवकरच सत्य समोर आणणार!
  • पुण्यात भाजप-काँग्रेस कार्यकर्त्यांत झटापट; जखमींची काळजी घेण्याचे हर्षवर्धन सपकाळ यांचे निर्देश
 जिल्हा

माझगाव ताडवाडीतील बीआयटी चाळ पुनर्विकास प्रकरणी तातडीची बैठक घ्या – सभापती प्रा. राम शिंदे

डिजिटल पुणे    17-02-2026 15:26:56

मुंबई : माझगाव ताडवाडीतील बीआयटी चाळ पुनर्विकास प्रकरणी म्हाडा, बृहन्मुंबई महानगरपालिका व विकासकांसह महानगरपालिका आयुक्त यांच्यासमवेत संयुक्त बैठक आयोजित  करण्यात यावी. तसेच याप्रकरणी समन्वयाने तोडगा काढून प्रलंबित पुनर्विकास कामाला तातडीने गती देण्यात यावी. याबाबतचा अहवाल आठ दिवसांत सादर करावा, असे निर्देश विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी दिले.

माझगाव ताडवाडी येथील बीआटी चाळ क्र. 1 ते 16 तसेच ए, बी, सी ब्लॉक यांच्या पुनर्विकासासंदर्भात विधानपरिषद सदस्य शशिकांत शिंदे यांच्या 17 जुलै, 2025 रोजीच्या लक्षवेधीच्या अनुषंगाने विधानभवनात झाली. बैठकीला आमदार शशिकांत शिंदे, आमदार सचिन अहिर, आमदार मनोज जामसुतकर, माजी मंत्री बाळा नांदगावकर, ‘म्हाडा’चे मुख्याधिकारी मिलिंद बोरीकर, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त, डॉ. अविनाश ढाकणे तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.

सभापती प्रा.राम शिंदे म्हणाले, हक्काच्या घरांपासून वंचित असलेल्या रहिवाशांना तातडीने दिलासा मिळणे आवश्यक आहे. पुनर्विकास प्रकल्पाच्या विलंबामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेक रहिवासी तात्पुरत्या निवासस्थानी अत्यंत गैरसोयीच्या परिस्थितीत राहतात. त्यामुळे हे काम प्राधान्याने व्हावे. महापालिका आयुक्तांसमवेत सर्व संबंधितांची विकासकासह एकत्र बैठक आयोजित करावी आणि पुनर्विकासाचे काम तातडीने सुरु व्हावे यादृष्टीने कार्यवाही करावी. याबाबतचा अहवाल आठ दिवसाच्या आत सादर करण्याचे निर्देश यावेळी सभापती प्रा. शिंदे यांनी दिले.


 Give Feedback



 जाहिराती