सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मोठी बातमी! अजित दादांच्या निधनादिवशीच मंत्रालयात फाईलवर सह्या; राज्यभरातून संताप होताच मुख्यमंत्र्यांकडून स्थगिती
  • रोहित पवारांनी दिल्लीत खासगी गुप्तहेरांची भेट घेतली, दादांचा अपघात की घातपात, लवकरच सत्य समोर आणणार!
  • पुण्यात भाजप-काँग्रेस कार्यकर्त्यांत झटापट; जखमींची काळजी घेण्याचे हर्षवर्धन सपकाळ यांचे निर्देश
 शहर

निवडणुकीतील आश्वासनाप्रमाणे ५०० स्क्वेअर फुटापर्यंत मिळकतीना करमाफी द्या: आम आदमी पार्टी

डिजिटल पुणे    18-02-2026 11:19:49

पुणे : पुणे महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी 2026- 27 साठी चा अर्थसंकल्प प्रस्ताव या पुढील मांडलेला असून त्यामध्ये दहा टक्के नंतर पाच टक्के मिळकत दरवाढ प्रस्तावित केलेली आहे. या संबंधातील प्रस्ताव स्थायी समिती बैठकीमध्ये मान्य होऊन आज तो सर्वसाधारण सभेत मांडला जाईल असे कळते. 

दरम्यान मागील आठवड्यात आम आदमी पार्टीने पुणे महानगरपालिकेच्या बाहेर या करवाढीच्या विरोधामध्ये तीव्र आंदोलन केले. सामान्य पुणेकर महागाईने भरडला गेलेला असताना आणि त्याला योग्य सुविधा मिळत नसताना अशी करवाढ संयुक्तिक नाही, यावेळेस या महानगरपालिका निवडणुकीमध्ये भाजपने ५०० स्क्वेअर फुटापर्यंत मिळकतींना पूर्ण करमाफीचे आश्वासन दिले होते. त्यामुळे आता ते आश्वासन पूर्ण करावे अशी मागणी या आंदोलनात करण्यात आली होती.

गेल्या वर्षीच्या अंदाजपत्रकात २८०० कोटीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. परंतु प्रशासनाने आतापर्यंत केवळ २२०० कोटी जमा केले आहेत. तसेच अनेक व्यावसायिक मिळकतींवर कर लागू केला गेलेला नाही. गंभीर बाब म्हणजे थकीत ७७०० कोटी रक्कम ही  अजूनही येणे असून ती रक्कम वसूल करण्याऐवजी प्रामाणिक करदात्यावर या करवाढीचे ओझे टाकणे पूर्णपणे अयोग्य आहे अशी आम आदमी पार्टीची भूमिका आहे. 

निवडणुकीदरम्यान भाजपने संकल्प पुण्याच्या विकासाचा असे म्हणत जाहीरनाम्यात पाचशे स्क्वेअर फुटापर्यंतच्या मालमत्तेस पूर्ण मिळकत तर माफी देण्याचे जाहीर केले आहे. आता हे आश्वासन पाळा असे आवाहन आम आदमी पार्टीने सत्ताधारी भाजपला केले आहे. केवळ सत्तेसाठीची जुमलेबाजी न करता पुणेकरांना दिलेला शब्द पाळा व प्रामाणिक आणि छोट्या मिळकत धारकांना दिलासा द्या अशी मागणी करण्यात आली आहे.

 


 Give Feedback



 जाहिराती