सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मोठी बातमी! अजित दादांच्या निधनादिवशीच मंत्रालयात फाईलवर सह्या; राज्यभरातून संताप होताच मुख्यमंत्र्यांकडून स्थगिती
  • रोहित पवारांनी दिल्लीत खासगी गुप्तहेरांची भेट घेतली, दादांचा अपघात की घातपात, लवकरच सत्य समोर आणणार!
  • पुण्यात भाजप-काँग्रेस कार्यकर्त्यांत झटापट; जखमींची काळजी घेण्याचे हर्षवर्धन सपकाळ यांचे निर्देश
 जिल्हा

‘शिवजयंती निमित्त विलेपार्ले येथे शिवकल्याण राजा’ कार्यक्रम

डिजिटल पुणे    19-02-2026 10:44:56

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून ‘शिवकल्याण राजा’ या गाजलेल्या ध्वनिफितीला ५२ वर्षे पूर्ण झाल्याच्या औचित्याने विशेष गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. पंडित हृदयनाथ मंगेशकर या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.

‘शिवकल्याण राजा’ ही ध्वनिफीत शिवशाहीर दिवंगत बाबासाहेब पुरंदरे यांच्या संकल्पनेतून साकारली असून, पं. हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केली आहे. दिवंगत लता मंगेशकर यांनी गायन केलेल्या या अमर काव्यकृतीने शिवभक्तांच्या हृदयात अढळ स्थान निर्माण केले आहे. या ऐतिहासिक कलाकृतीच्या सुवर्णक्षणांचा पुनःअनुभव देण्यासाठी हा कार्यक्रम सादर होत आहे.

कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून ज्येष्ठ साहित्यिक व मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे. विभावरी आपटे, मनीषा निश्चल, अजित परब आणि ऋतुजा तारे हे कलावंत शिवगौरव गीते सादर करणार आहेत. तसेच वादक कलाकारांमध्ये विवेक परांजपे, डॉ. राजेंद्र दुरकर, अजय अत्रे, अपूर्व द्रविड, सचिन इंगळे, केदार परांजपे, विशाल गंडतरवार, विक्रम भट आणि ऋतुराज कोरे यांचा सहभाग असणार आहे. कार्यक्रमांचे संयोजन मंदार कार्णिक व प्रसाद महाडकर करणार आहेत.

हा कार्यक्रम शिवजयंतीनिमित्त गुरुवार, १९ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ६.०० वाजता दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह, विलेपार्ले (पूर्व), मुंबई येथे होणार आहे. या कार्यक्रमास प्रवेश विनामूल्य आहे.सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमास रसिक प्रेक्षकांनी उपस्थित राहून शिवगौरव गीतांचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.


 Give Feedback



 जाहिराती