सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मोठी बातमी! अजित दादांच्या निधनादिवशीच मंत्रालयात फाईलवर सह्या; राज्यभरातून संताप होताच मुख्यमंत्र्यांकडून स्थगिती
  • रोहित पवारांनी दिल्लीत खासगी गुप्तहेरांची भेट घेतली, दादांचा अपघात की घातपात, लवकरच सत्य समोर आणणार!
  • पुण्यात भाजप-काँग्रेस कार्यकर्त्यांत झटापट; जखमींची काळजी घेण्याचे हर्षवर्धन सपकाळ यांचे निर्देश
 शहर

शिवनेरीच्या साक्षीने सुनेत्रा पवार यांचे पहिले शासकीय मनोगत; भावुक होत दिला ‘विचारांचा वारसा जपण्याचा’ शब्द

डिजिटल पुणे    19-02-2026 14:13:47

शिवनेरी (जुन्नर, पुणे): छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 396व्या जयंतीनिमित्त किल्ले शिवनेरी किल्ला येथे भव्य शासकीय सोहळा उत्साहात पार पडला. पहाटेपासूनच ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या जयघोषात गड दुमदुमला होता. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.

“आजचा दिवस जबाबदारीची जाणीव करून देणारा”

शासकीय कार्यक्रमात प्रथमच मनोगत व्यक्त करताना सुनेत्रा पवार भावुक झाल्या. “मी ज्या कठीण प्रसंगात उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली, त्या क्षणी माझ्या डोळ्यांसमोर जिजाऊ उभ्या होत्या,” असे सांगत त्यांनी छत्रपतींच्या विचारांनी प्रेरित होऊन राज्यातील शेतकरी-कष्टकरी जनतेसाठी कटिबद्ध राहण्याचा निर्धार व्यक्त केला. शिवरायांच्या जन्मभूमीवर बोलताना अंगावर काटा आल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

शिव-शाहू-फुले-आंबेडकर विचारांचा वारसा जपण्याची ग्वाही

“आदरणीय दादांनी आयुष्यभर ज्या शिव-शाहू-फुले-आंबेडकर विचारांची वाटचाल केली, तो वारसा मी कधीही सोडणार नाही,” असा शब्द त्यांनी शिवजयंतीच्या दिवशी दिला. कठीण प्रसंगातही जिद्दीने उभे राहण्याची प्रेरणा जिजाऊंकडून मिळाल्याचे त्यांनी नमूद केले.

शिवनेरीच्या विकासासाठी प्रयत्नांची आठवण

सुनेत्रा पवार यांनी यावेळी अजित पवार यांच्या शिवनेरीवरील जिव्हाळ्याची आठवण करून दिली. शिवनेरीसह आग्रा, संगमेश्वर, रायगड आणि वढू बुद्रुक येथे ऐतिहासिक स्थळांच्या विकासासाठी उपक्रम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. भावी पिढीला प्रेरणा देणारे प्रकल्प राबवण्याचा सरकारचा मानस असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

गडावर जल्लोषाचे वातावरण

जन्मोत्सव सोहळ्यात ढोल-ताशांच्या गजरात महाराजांचा पाळणा जोजवण्यात आला. शिवजन्मस्थळ परिसरात आकर्षक फुलांची सजावट व रोषणाई करण्यात आली होती. राज्यभरातून आलेल्या हजारो शिवभक्तांच्या उपस्थितीत सोहळा मंगलमय वातावरणात पार पडला.शिवरायांच्या जन्मभूमीवरून दिलेल्या या पहिल्या भाषणातून सुनेत्रा पवार यांनी जनतेप्रती बांधिलकी आणि विचारांची निष्ठा अधोरेखित केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.


 Give Feedback



 जाहिराती