सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • पोलीस अधिकाऱ्याने मागितली 35 हजारांची लाच, ACB ने रचला सापळा, पुण्यातील पौडमध्ये रंगेहात पकडलं
  • अजितदादांना नरेंद्र मोदी अन् अमित शाहाच न्याय देऊ शकतात, VSR नावाच्या कंपनीला खूप मोठ्या लोकांचा पाठिंबा,मंत्री राममोहन नायडूंचा राजीनामा घ्या; रोहित पवारांचा दिल्लीत एल्गार
 शहर

पुण्यात सहकारनगर येथे हांडे देशमुख परिवारात उत्साहात शिवजयंती साजरी

गजानन मेनकुदळे    21-02-2026 10:48:47

पुणे : “घराघरात शिवराय, मनामनात शिवराय” हा संकल्प गेली १५ वर्षे जपणाऱ्या सहकारनगर, पुणे येथील समस्त हांडे देशमुख परिवारात यंदाही शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त पारंपरिक पद्धतीने पूजन, अभिवादन आणि सामाजिक संदेश देणारे उपक्रम आयोजित करण्यात आले.

छत्रपतींचा जन्म ज्या शिवनेरी किल्ला येथे झाला, त्या पवित्र स्मृतींना वंदन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या सोहळ्यास पुण्याच्या महापौर मा. सौ. मंजुषा नागपुरे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच नगरसेवक सुभाष जगताप, धीरज घाटे, अमर आवळे, प्रशांत थोपटे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पुणे महानगर कार्यवाह सचिनजी भोसले, विश्व हिंदू परिषद पश्चिम महाराष्ट्र महामंत्री किशोरजी चव्हाण, जनसेवा बँकेचे सीओ पोळेकर साहेब, बापू शिळीमकर आदी मान्यवर उपस्थित होते.

 

दरवर्षीप्रमाणे यंदाही उपस्थित शिवभक्तांना छत्रपती शिवाजी महाराजांची ‘राजमुद्रा’ भेट देण्यात आली. सामाजिक बांधिलकी जपत पर्यावरणपूरक कागदी पिशव्यांचे वाटप करण्यात आले. या पिशव्यांवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त “पंचपरिवर्तन”चा संदेश देण्यात आला.

महापौर मंजुषा नागपुरे यांनी या अभिनव उपक्रमाचे आणि घरगुती पातळीवर सातत्याने साजऱ्या होणाऱ्या शिवजयंतीचे विशेष कौतुक केले. प्रत्येक घराघरात अशा पद्धतीने शिवजयंती साजरी व्हावी, अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या.या कार्यक्रमाचे आयोजन समस्त हांडे देशमुख परिवार — प्रविण व दीपक शरदराव हांडे देशमुख, राजेश्री, तेजश्री, अनुश्री, हिंदवी स्वराज, शिवराज सई  यांच्या पुढाकारातून करण्यात आले. शिवभक्तांच्या उत्स्फूर्त उपस्थितीत आणि जयघोषात सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.


 Give Feedback



 जाहिराती