सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • कृष्णा आंधळे आत्तापर्यंत तीनवेळा गावी येऊन गेला; सरपंच संतोष देशमुखांचे बंधू धनंजय यांचा खळबळजनक दावा
  • नागपुरात बारावीच्या केमिस्ट्री-फिजिक्स पेपरफुटीचा संशय; व्हॉट्सअॅप ग्रुपमधून प्रश्नपत्रिका प्रसारित? तपासाला वेग
  • बॉलिवूड सेलिब्रिटींनंतर बिष्णोई गँगचा मोर्चा राजकारण्यांकडे? काँग्रेस आमदाराला जीवे मारण्याची धमकी
  • पोलीस भरतीच्या स्वप्नावर पडलं विरजण! शारीरिक चाचणीवेळी धावताना तरुणाचा मृत्यू, छ. संभाजीनगरमधील दुर्दैवी घटना
  • पोलीस अधिकाऱ्याने मागितली 35 हजारांची लाच, ACB ने रचला सापळा, पुण्यातील पौडमध्ये रंगेहात पकडलं
  • अजितदादांना नरेंद्र मोदी अन् अमित शाहाच न्याय देऊ शकतात, VSR नावाच्या कंपनीला खूप मोठ्या लोकांचा पाठिंबा,मंत्री राममोहन नायडूंचा राजीनामा घ्या; रोहित पवारांचा दिल्लीत एल्गार
 DIGITAL PUNE NEWS

एआयच्या माध्यमातून लोकशाही सशक्त करण्याची संधी -मंत्री अ‍ॅड. आशिष शेलार

डिजिटल पुणे    21-02-2026 17:35:52

नवी दिल्ली :  एआय ही केवळ तंत्रज्ञान क्रांती नसून, ती लोकशाही अधिक सशक्त करण्याची संधी आहे. सुरक्षित आणि स्मार्ट शासनाची गरज लक्षात घेता महाराष्ट्राने एआयचा प्रशासनात प्रभावी वापर केला असल्याचे सांगून महाराष्ट्र या तंत्रज्ञान क्रांतीचे केंद्र बनले असल्याचा विश्वास राज्याचे माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्यमंत्री अ‍ॅड. आशिष शेलार यांनी व्यक्त केला.नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे आयोजित एआय इम्पॅक्ट समिट 2026 मध्ये महाराष्ट्र शासनाच्या वतीने आयोजित ‘महा एआय: बिल्डिंग सेफ, सिक्युअर अँड स्मार्ट गव्हर्नन्स’ या सत्रात ते बोलत होते. व्यासपीठावर माहिती व तंत्रज्ञान सचिव वीरेंद्र सिंग उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राने तंत्रज्ञानाच्या साहाय्याने प्रशासनाला मानवी चेहरा देण्याबरोबरच अधिक वेगवान, पारदर्शक केले असल्याचे सांगून मंत्री ॲड. शेलार यांनी महाराष्ट्र शासनाने केलेल्या डिजिटल प्रवासाची सविस्तर माहिती दिली. मायक्रोसॉफ्टच्या सहकार्याने राबविण्यात आलेल्या ‘महा क्राईम’ प्रकल्पामुळे गुन्हेगारी रोखणे, तपास प्रक्रिया गतिमान करणे आणि पारदर्शकता वाढविणे शक्य झाले. या प्रणालीचे मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्या नाडेला यांनीही कौतुक केल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

राज्यात महा आयटी एक प्रगत ‘इंटेलिजेंट गव्हर्नमेंट इन्फ्रास्ट्रक्चर’ उभारत असून हे क्लाउड-नेटिव्ह आणि एपीआय-आधारित मॉडेल आहे. या माध्यमातून स्मार्ट भरती प्रक्रिया, शहरी स्थानिक संस्थांसाठी एआय-आधारित मालमत्ता मॅपिंग, रिअल-टाइम नागरी डॅशबोर्ड, वाहतूक व पूर व्यवस्थापनासाठी तात्काळ डेटा विश्लेषण, हवामान आणि नागरी तक्रार निवारण प्रणाली हे उपक्रम राबविले जात असल्याचेही मंत्री ॲड. शेलार यांनी यावेळी सांगितले.

एआयचा वापर प्रशासनाला नागरिकांपासून दूर नेण्यासाठी नव्हे, तर अधिक संवेदनशील, अचूक आणि प्रतिसादक्षम करण्यासाठी केला जात असल्याचेही मंत्री ‍डॉ. शेलार यांनी स्पष्ट केले.वाढत्या सायबर धोक्यांचा उल्लेख करताना त्यांनी सांगितले की, जसे मानवी शरीरासाठी आरोग्य आवश्यक आहे. तसेच समाजासाठी डिजिटल आरोग्य अनिवार्य आहे. दिशाभूल करणारी माहिती आणि सायबर हल्ल्यां विरोधात मजबूत सायबर सुरक्षा आणि हायब्रिड पडताळणी यंत्रणा उभारण्यास महाराष्ट्र शासन कटिबद्ध आहे. तरी जास्तीत जास्त जागतिक तंत्रज्ञान संस्थानी महाराष्ट्रासोबत भागीदारी करावी असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

या सत्राच्या दुसऱ्या टप्प्यात ‘मित्रा’चे मुख्य कार्यकारी अधिकारी, प्रवीण परदेशी, महाराष्ट्र सायबर सेलचे अतिरिक्त पोलीस महासंचालक यशस्वी यादव, डॉ.अनुपम चटोपाध्याय, रणजित गोस्वामी, सुरेश सेठी, डॉ अमित कपूर, बिना सरकार, देवरुप धर यांनी तांत्रिक अनुभव मांडले.प्रवीण परदेशी यांनी सौर ऊर्जा आणि कर्मचारी प्रशिक्षणाचे महत्त्व विषद केले. सरकारी नियमांमधील गुंता सोडवण्यासाठी आणि नागरिकांच्या मदतीसाठी महा जीपीटी हे विशेष एआय मॉडेल विकसित केले जात असल्याचे सांगितले.

यशस्वी यादव यांनी भविष्यातील ‘क्वांटम कॉम्प्युटिंग’च्या धोक्यांपासून बँकिंग यंत्रणा सुरक्षित ठेवण्याचे आव्हान आपल्यासमोर असल्याचे सांगून सायबर सुरक्षेसाठी एआयचा वापर करून एक हजार कोटी रुपये आणि 70 मुलींचे प्राण वाचवल्याचे सांगितले.डॉ. अनुपम चटोपाध्याय यांनी डीपफेक बनावट व्हिडिओ आणि ऑडिओ ओळखण्यातील तांत्रिक आव्हाने स्पष्ट केली. स्थानिक भाषांमध्ये डीपफेक शोधण्यासाठी डेटा तयार करणे आणि खासगी माहिती सुरक्षित ठेवून एआयचा वापर करण्यावर त्यांनी विशेष भर दिला.

प्रशासकीय दृष्टिकोनातून सुरेश  सेठी यांनी स्पष्ट केले की, भारताचे डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर अत्यंत मजबूत आहे. आधार आणि यूपीआयसारख्या व्यासपीठांवर एआयचा स्तर वापरून आपण भविष्यसूचक प्रशासनाकडे वळू शकतो. यामुळे सरकारी योजनांचे लाभ गरजूंपर्यंत मागणी करण्यापूर्वीच पोहोचवता येतील.  मात्र हे करताना पारदर्शक, स्पष्टीकरणात्मक आणि मानवी हस्तक्षेपास वाव देणारे एआय तंत्रज्ञान असणे गरजेचे आहे.रणजित गोस्वामी यांनी टाटा समूहाच्या विचारसरणीनुसार तंत्रज्ञान हे केवळ कार्यक्षमता वाढवण्यासाठी नसून समाजाच्या कल्याणासाठी आणि आनंदासाठी असावे. सर्व सरकारी विभागांनी एकात्मिक डेटाबेस वापरून नागरिकांना अधिक सुलभ सेवा द्याव्यात, अशी भूमिका मांडली.

नैतिकतेच्या मुद्द्यावर बीना सरकार यांनी महिला आणि मुलांच्या सुरक्षेवर विशेष भर दिला. स्मार्ट ग्लासेससारखी उपकरणे परवानगीशिवाय चित्रीकरण करून गोपनीयतेचा भंग करू शकतात. कोणतेही नवीन तंत्रज्ञान किंवा हार्डवेअर बाजारात आणण्यापूर्वी ते 50 टक्के लोकसंख्येला (महिलांना) असुरक्षित तर करत नाही ना, याची पडताळणी ‘इंडिया सेफ्टी इन्स्टिट्यूट’ कडून होणे अनिवार्य असल्याचे त्यांनी सांगितले. सत्राच्या अखेरीस, डॉ. अमित कपूर यांनी पायाभूत सुविधांच्या कमतरतेवर बोट ठेवले. महाराष्ट्रातील 80 टक्के कर्मचारी वर्ग अजूनही प्राथमिक कौशल्य स्तरावर असून, त्यांच्या शिक्षणात सुधारणा करणे आवश्यक आहे. तसेच, एआयचा विस्तार टियर-2 आणि टियर-3 शहरांमध्ये करण्यासाठी हाय-स्पीड इंटरनेट आणि डेटा सेंटर्सचे जाळे युद्धपातळीवर विणण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.कार्यक्रमाची सुरुवात आयटी विभागाचे सचिव वीरेंद्र सिंह यांच्या स्वागतपर भाषणाने झाली. तर या विशेष सत्राचे संचलन देवरुप धर यांनी केले.


 Give Feedback



 जाहिराती