मुंबई : शेतीमध्ये आधुनिकतेचा नवा अध्याय सुरू करण्यासाठी ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ महत्वाची भूमिका बजावत आहे. अधिक सूक्ष्म (हायपरलोकल) हवामानावर आधारित शेतकऱ्यांसाठी रिअल-टाइम डेटा प्रणाली बळकट करणे, बहुभाषिक व्हॉईस सेवा विस्तार करणे, मृदा तपासणी ‘एआय’च्या माध्यमातून करणे, शेतकऱ्यापर्यंत अचूक माहिती पोहोचवते.आंतरराज्य डिजीटल पायाभूत सुविधांसाठी परस्परसंवाद वाढविणे गरजेचे असल्याचे मत “कृषीसाठी जनरेटिव्ह एआय: प्रथम टप्प्यातील बुद्धिमत्ता उलगडणे” या चर्चासत्रात मत व्यक्त करण्यात आले.
मुंबई येथे आयोजित ‘एआय’ फॉर ॲग्री: शेतीचे भविष्य नव्याने घडविताना’ या दोन दिवसीय परिषदेत “कृषीसाठी जनरेटिव्ह एआय: प्रथम टप्प्यातील बुद्धिमत्ता उलगडणे” या विषयावर सखोल चर्चा करण्यात आली. या चर्चासत्रात एकस्टेप फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी जगदीश बाबू, एआय या आशिया प्रादेशिक विभाग, जागतिक बैंकेचे संचालक महेश उत्तमचंदानी, आयआयटी मुंबईचे तंत्रज्ञान नवोपक्रम केंद्र, मुख्य तंत्रज्ञान अधिकारी डॉ. प्रसाद रामनाथन यांनी सहभाग घेतला.
या सत्राचे समन्वय एकस्टेप फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी जगदीश बाबू यांनी केले.जनरेटिव्ह ‘एआय’ मुळे शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत अचूक माहिती कशी पोहोचवता येईल, याचा आराखडा या सत्रात मांडण्यात आला.आयआयटी मुंबई चे तंत्रज्ञान नवोपक्रम केंद्र, मुख्य तंत्रज्ञान अधिकारी डॉ. प्रसाद रामनाथन यांनी तांत्रिक दृष्टिकोनातून जनरेटिव्ह एआयच्या क्षमतांचे सादरीकरण केले.संशोधनातील गुंतागुंतीचा डेटा सुलभ भाषेत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आयआयटी मुंबई करत असलेल्या नाविन्यपूर्ण प्रयोगांची त्यांनी माहिती दिली.
आशिया प्रादेशिक विभाग, जागतिक बँकेचे संचालक महेश उत्तमचंदानी यांनी आशियाई देशांमधील कृषी अर्थव्यवस्थेत एआयमुळे होणाऱ्या बदलांवर भाष्य केले. कृषी क्षेत्रात मोठी गुंतवणूक आणि तंत्रज्ञान क्रांती आणण्यासाठी जनरेटिव्ह ‘एआय’ हे एक प्रभावी साधन असल्याचे त्यांनी सांगितले. ‘एआय’ ही पर्यायी सुविधा नसून सल्ला, वित्तपुरवठा व बाजारपेठ प्रवेशासाठी मुख्य वितरण रचना बनली आहे. विस्तारक्षम प्रणालींसाठी मुक्त व परस्परसंवादी डिजिटल सार्वजनिक पायाभूत रचना, सक्षम धोरणात्मक व नियामक चौकट, सरकार, शैक्षणिक संस्था, खाजगी क्षेत्र भागीदारी, मोठ्या प्रमाणावर अंमलबजावणीपूर्वी सुरक्षित एआय ‘सॅंडबॉक्स’ चाचण्या, जागतिक बँकेच्या मिशन ॲग्रीकनेक्ट चौकटीचा उल्लेख करत त्यांनी भारतातील उपक्रम जागतिक स्तरावर आदर्श ठरू शकतात, असे नमूद केले.
कृषी विभागाचे नानाजी कृषी संजीवनी प्रकल्पाचे प्रकल्प संचालक परिमल सिंह यांनी महाराष्ट्र शासनाच्या वतीने सरकारी योजना आणि तंत्रज्ञानाचा संगम कसा साधला जात आहे, यावर प्रकाश टाकला हवामान बदलाच्या संकटात शेतकऱ्यांना जनरेटिव्ह एआय द्वारे ‘रिअल-टाइम’ सल्ला देऊन त्यांचे नुकसान टाळण्यासाठी राबवल्या जाणाऱ्या विशेष प्रकल्पांची त्यांनी माहिती दिली. या सत्रात प्रामुख्याने तंत्रज्ञान निर्मितीच्या पहिल्या टप्प्यापासून ते थेट शेतकऱ्याच्या बांधापर्यंत ही बुद्धिमत्ता कशी वापरता येईल. याबाबत माहिती दिली. ‘महा-विस्तार’ची समावेशक रचना या उपक्रमामागील दृष्टीकोन स्पष्ट केला.
शेतकऱ्यांना विखुरलेल्या माहितीऐवजी एकात्मिक, शासन-मान्य आणि विश्वासार्ह सल्ला प्रणाली देण्यावर भर आहे.कृषी विद्यापीठे व संशोधन संस्थांचे एपीआय द्वारे एकत्रीकरण,ॲग्री स्टॅकचा वापरून स्थानाधारित वैयक्तिक सल्ला, स्मार्टफोन नसलेल्या शेतकऱ्यांसाठी व्हॉईस-आधारित सेवा,वेबसाइट अलर्टऐवजी लक्षित पुश नोटिफिकेशन व टेलिफोनी संदेश, पीक नुकसानाच्या काळात वाढलेल्या प्रश्नांमधून रिअल-टाइम डेटा व डायनॅमिक अपडेट्सचे महत्त्व अधोरेखित झाले. मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचे प्रश्न ऐकल्यास धोरणनिर्मितीसाठी उपयुक्त माहिती मिळते, असे त्यांनी सांगितले.
प्रसाद रामनाथन यांनी प्रयोगशाळा ते शेती यावर भर दिला.डॉ. रमणाथन यांनी प्रयोगशाळेतील संशोधन प्रत्यक्ष शेतात नेण्याच्या संकल्पनेवर भर दिला. त्यांनी एआय-आधारित कीड व रोग ओळख प्रणालीची माहिती दिली.६८ रोग,३८ किडी,१८ पिकांमध्ये असलेली कीड व रोग ही प्रणाली ओळखू शकते.ग्रामीण भागात वापरासाठी हलकी व ‘एज-कम्पॅटिबल’ मॉडेल्स विकसित करण्याचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. भारतीय कृषीसाठी संदर्भाधारित भाषा मॉडेल विकसित होत असून, व्हिजन-लँग्वेज मॉडेल्स व व्हॉईस-फर्स्ट एआयमुळे वैयक्तिकृत सल्ला देण्याचा वेग वाढेल, असे त्यांनी सांगितले.
अनिंदा बॅनर्जी यांनी ‘भारत व्हिस्टा’ची विश्वासार्ह एआय सेवाया जनरेटिव्ह एआय-आधारित कृषी सल्ला प्लॅटफॉर्मची माहिती दिली. ही सेवा आयसीएआर व राज्य कृषी विद्यापीठांच्या अधिकृत माहितीस आधारलेली आहे.या ही एआय सेवा बहुभाषिक संवादात्मक एआय असून, 155261 या शॉर्ट कोडद्वारे व्हॉईस सेवा उपलब्ध आहे.,स्मार्टफोन व नॉन-स्मार्टफोन दोन्हीसाठी उपलब्ध आहे.आयएमडी हवामान सेवेशी एकत्रीकरण केले असून टप्प्याटप्प्याने २२ भारतीय भाषांमध्ये विस्तार होणार असल्याचे सांगितले.शासकीय अधिकारी, तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञ आणि कृषी शास्त्रज्ञांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या सत्राने कृषी विकासाची एक नवी दिशा स्पष्ट केली आहे. या सत्रासाठी उपस्थितांचे आभारप्रदर्शन फलोत्पादन विभागाचे संचालक अंकुश माने यांनी केले