सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • काँग्रेस प्रवक्ते हनुमंत पवारांना मारहाण, पोलिसांनी तुषार दामगुडेची रिव्हॉल्व्हर जप्त केली अन् नोटीस देऊन घरी सोडलं
  • विमाननगरातील स्पा सेंटरवर पोलिसांची कारवाई; उडी मारलेल्या महिलेचा मृत्यू, व्यवस्थापक जखमी
  • पार्थ पवार राज्यसभेवर जाणार, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय
 शहर

“जे केलं ते योग्यच; कोणतीही खंत नाही” — तुषार दामगुडे यांचा ठाम दावा

डिजिटल पुणे    24-02-2026 15:43:59

पुणे : हिंदुत्ववादी कार्यकर्ते तुषार दामगुडे यांनी काल घडलेल्या वादग्रस्त प्रकाराबाबत आपली भूमिका स्पष्ट करताना आपण केलेल्या कृतीबद्दल कोणतीही खंत नसल्याचे सांगितले. काँग्रेस प्रवक्ते हनुमंत पवार यांनी यापूर्वी एका टीव्ही चर्चेदरम्यान धमकी दिली आणि जातिवाचक वक्तव्य केल्याचा आरोप दामगुडे यांनी केला. “कालही तशाच प्रवृत्तीचा अनुभव आला. त्यामुळे मी त्यांना ठाम शब्दांत उत्तर दिले,” असे ते म्हणाले.

दामगुडे यांच्या मते, काही व्यक्तींना स्पष्ट आणि कठोर शब्दांत प्रत्युत्तर देणे गरजेचे असते. “त्या ठिकाणी जे काही घडले, ते योग्यच होते,” असे त्यांनी नमूद केले. डिबेटदरम्यान पवार यांनी वैयक्तिक पातळीवर टीका केल्याचा दावाही त्यांनी केला.

दरम्यान, दामगुडे यांनी आपल्या सुरक्षेसाठी परवानाधारक शस्त्र बाळगत असल्याचे स्पष्ट केले. “मी नक्षलग्रस्त भागात काम करतो. त्यामुळे कायदेशीर परवान्यासह शस्त्र ठेवले आहे. पोलिसांनी मागणी केल्यानंतर ते शस्त्र मी त्यांच्याकडे जमा केले आहे,” असे त्यांनी सांगितले. प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरू असल्याची माहितीही त्यांनी दिली.

पवार यांची प्रतिक्रिया

काँग्रेस प्रवक्ते हनुमंत पवार यांनी या घटनेवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून कठोर कारवाईची अपेक्षा असल्याचे त्यांनी म्हटले. “आरोपींवर कडक पावले उचलली गेली पाहिजेत. केवळ नोटीस देऊन सोडणे गंभीर बाब आहे,” असे ते म्हणाले.

तसेच, परवानाधारक पिस्तूल वैयक्तिक सुरक्षेसाठी आहे की दबाव टाकण्यासाठी, याची चौकशी व्हावी, अशी मागणीही पवार यांनी केली. घटनेनंतर त्यांनी पोलीस आयुक्तांची भेट घेण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले.दरम्यान, या प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली असून पोलिसांच्या तपासाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


 Give Feedback



 जाहिराती