सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • काँग्रेस प्रवक्ते हनुमंत पवारांना मारहाण, पोलिसांनी तुषार दामगुडेची रिव्हॉल्व्हर जप्त केली अन् नोटीस देऊन घरी सोडलं
  • विमाननगरातील स्पा सेंटरवर पोलिसांची कारवाई; उडी मारलेल्या महिलेचा मृत्यू, व्यवस्थापक जखमी
  • पार्थ पवार राज्यसभेवर जाणार, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय
 शहर

भारती विद्यापीठात ‘स्टार्टअप स्पार्क’ने चेतवली उद्योजकतेची ज्योत

डिजिटल पुणे    24-02-2026 16:32:13

पुणे : भारती विद्यापीठाचे महिला अभियांत्रिकी महाविद्यालय पुणे येथे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास मंडळ यांच्या सहकार्याने “स्टार्टअप स्पार्क : इग्नायटिंग एंटरप्रेन्योरियल माइंड्स” या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे यशस्वी आयोजन करण्यात आले. ही कार्यशाळा द्वितीय वर्षाच्या विद्यार्थिनींसाठी आयोजित करण्यात आली होती, ज्यायोगे त्यांच्या अभियांत्रिकी शिक्षणाच्या सुरुवातीच्या टप्प्यातच उद्योजकतेची विचारसरणी विकसित होईल.

प्राचार्य प्रा. डॉ. प्रदीप जाधव यांनी मार्गदर्शनपर भाषणात आजच्या झपाट्याने बदलणाऱ्या तंत्रज्ञानाच्या युगात नवोन्मेष, स्टार्टअप संस्कृती आणि आत्मनिर्भरतेचे वाढते महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी विद्यार्थिनींना पारंपरिक करिअरच्या चौकटीपलीकडे जाऊन व्यापक विचार करण्याचे आणि नव्या संधींचा धाडसाने शोध घेण्याचे आवाहन केले. त्यांच्या प्रेरणादायी विचारांनी विद्यार्थिनींमध्ये नवचैतन्य आणि आत्मविश्वास निर्माण झाला.

कार्यशाळेत आयबीएम पुणे येथील श्री. मनोजकुमार चौधरी, केनलेटचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सतीश पाटील तसेच एमस्क्वेअर टेक्नॉलॉजीजचे श्री. करण अंतुरकर यांनी तज्ज्ञ मार्गदर्शन केले.त्यांनी संकल्पनांची निर्मिती, उत्पादन विकास, निधी उभारणीची धोरणे, कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित नवकल्पना आणि स्टार्टअपचा विस्तार यांसारख्या महत्त्वपूर्ण विषयांवर सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांच्या अनुभवसंपन्न विचारांनी विद्यार्थिनींना उद्योगविश्वाची वास्तवदृष्टी प्राप्त झाली.

यानंतर प्रश्नोत्तर सत्र पार पडले. विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत विविध शंका विचारल्या आणि व्यावहारिक मार्गदर्शन मिळवले. या सत्रातून विद्यार्थिनींमध्ये उद्योजकतेबद्दलची जिज्ञासा आणि आत्मविश्वास अधिक दृढ झाला.संपूर्ण कार्यक्रमाचे यशस्वी समन्वयन विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. कल्याणी चौधरी यांनी केले. उपप्राचार्या डॉ सुवर्णा चोरगे व उपप्रचार्य डॉ अविनाश पवार उपस्थित होते. आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली. ही कार्यशाळा विद्यार्थिनींसाठी प्रेरणादायी आणि मार्गदर्शक ठरली असून उद्योजकतेच्या दिशेने एक ठोस पाऊल मानले जात आहे.


 Give Feedback



 जाहिराती