सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • काँग्रेस प्रवक्ते हनुमंत पवारांना मारहाण, पोलिसांनी तुषार दामगुडेची रिव्हॉल्व्हर जप्त केली अन् नोटीस देऊन घरी सोडलं
  • विमाननगरातील स्पा सेंटरवर पोलिसांची कारवाई; उडी मारलेल्या महिलेचा मृत्यू, व्यवस्थापक जखमी
  • पार्थ पवार राज्यसभेवर जाणार, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय
 जिल्हा

उरणमध्ये सुपर स्पेशालिटी डॉक्टरांची ओपीडी सुविधेचा शुभारंभ ;मेडिकव्हर हॉस्पिटल्सचा अनोखा उपक्रम ;दर महिन्याला घेता येणार तज्ज्ञ डॉक्टरांच्या वैद्यकिय सेवेचा लाभ

विठ्ठल ममताबादे ( प्रतिनिधी )    24-02-2026 17:13:19

उरण :  उरण तसेच असपासचा परिसरातील नागरिकांसाठी नवी मुंबईतील मेडिकव्हर हॉस्पिटल्सच्या वतीने आता सुपर स्पेशालिटी डॉक्टरांची सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे गंभीर आजारांवरील उपचारांसाठी नागरिकांना आता मुंबई किंवा इतर मोठ्या शहरांकडे धाव घेण्याची गरज भासणार नाही.

या उपक्रमाअंतर्गत मूत्रविकार तसेच मूत्रपिंडाशी संबंधित आजारांवरील तज्ज्ञ डॉक्टरांच्या ओपीडीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. नेफ्रॉलॉजी उपचारांसाठी इंटरव्हेन्शनल नेफ्रोलॉजिस्ट डॉ. अमर कुलकर्णी हे दर महिन्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या शनिवारी दुपारी १२ ते २ या वेळेत उपलब्ध राहणार आहेत. ऑर्थोपेडिक्स व स्पाइन सर्जन डॉ. अरविंद जे. वाटकर हे महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी दुपारी २ ते ४ यावेळेत उपलब्ध असतील.

तसेच ऑर्थोपेडिक्स विभागाचे संचालक, रोबोटिक जॉइंट रिप्लेसमेंट, स्पोर्ट्स इंज्युरी आणि ऑर्थोपेडिक सर्जन डॉ. श्रवण कुमार पवार हे देखील दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या सोमवारी २ ते ४ या वेळेत रुग्णसेवेसाठी उपलब्ध असतील. युरोलॉजिस्ट डॉ. विकास भिसे हे दर महिन्याच्या बुधवारी दुपारी १२ ते २ या वेळेत उपलब्ध राहणार आहेत.

रोबोटिक जॉइंट रिप्लेसमेंट आणि ऑर्थोपेडिक सर्जन डॉ. प्रमोद भोर हे दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी दुपारी २ ते ४ या वेळेत उपलब्ध राहणार आहेत. हृदयविकार तज्ज्ञ डॉ. तामरीउ‌द्दीन धनावडे दर महिन्याच्या दुसऱ्या गुरुवारी दुपारी १२ ते २ या वेळेत उपलब्ध राहतील. दर महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी दुपारी १२ ते २ या वेळेत पोटविकार तज्ज्ञ डॉ. रावसाहेब राठोड यांच्या ओपीडीचा लाभघेता येईल.

 

ही वैद्यकीय सेवा पालवी हॉस्पिटलमध्ये दुपारी १२.०० ते २.०० व दुपारी २ ते ४ या वेळेत उपलब्ध होणार आहे. याकरिता पूर्व नोंदणी आवश्यक असून गरजूंनी ८६५५८४५८६६ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन हॉस्पिटलच्या वतीने करण्यात आले आहे.या उपक्रमामुळे उरण व परिसरातील नागरिकांना वेळीच तज्ज्ञ डॉक्टरांकडून सल्ला आणि उपचार घेण्याची संधी उपलब्ध होणार असून, आरोग्यसेवेच्या दृष्टीने हा उपक्रम एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.


 Give Feedback



 जाहिराती