सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • काँग्रेस प्रवक्ते हनुमंत पवारांना मारहाण, पोलिसांनी तुषार दामगुडेची रिव्हॉल्व्हर जप्त केली अन् नोटीस देऊन घरी सोडलं
  • विमाननगरातील स्पा सेंटरवर पोलिसांची कारवाई; उडी मारलेल्या महिलेचा मृत्यू, व्यवस्थापक जखमी
  • पार्थ पवार राज्यसभेवर जाणार, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय
 क्राईम

डोंबिवलीत नामांकित डॉक्टरचा आत्महत्येचा प्रयत्न; प्रेमसंबंधाच्या तणावातून टोकाचे पाऊल

डिजिटल पुणे    24-02-2026 17:54:11

डोंबिवली: डोंबिवली शहरात एका प्रसिद्ध रुग्णालयाशी संबंधित डॉक्टरने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. प्रेमसंबंधातील तणावामुळे मानसिक तणाव वाढल्याने संबंधित डॉक्टरने मोठ्या प्रमाणात मद्यप्राशन करून झोपेच्या गोळ्या घेतल्याची माहिती समोर आली आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित डॉक्टरचे त्याच रुग्णालयातील एका परिचारिकेशी प्रेमसंबंध होते. या नातेसंबंधातून लग्नाचा मुद्दा पुढे आला आणि त्यावरून दोघांमध्ये मतभेद निर्माण झाल्याचे समजते. डॉक्टर आधीच विवाहित असल्याने त्यांनी लग्नास नकार दिल्याने परिस्थिती अधिक तणावपूर्ण झाली होती.

काही काळापासून डॉक्टर स्वतंत्रपणे राहत होते. रुग्णालयात हजर न राहिल्याने सहकाऱ्यांनी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; मात्र प्रतिसाद न मिळाल्याने त्यांच्या निवासस्थानी जाऊन पाहणी करण्यात आली. तेव्हा डॉक्टर बेशुद्ध अवस्थेत आढळले. तातडीने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.

या प्रकरणाची नोंद विष्णूनगर पोलीस ठाण्यात झाली असून पुढील तपास सुरू आहे. प्राथमिक माहितीनुसार, वैयक्तिक आयुष्यातील तणावातून हे टोकाचे पाऊल उचलल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.दरम्यान, या घटनेमुळे डोंबिवलीतील वैद्यकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. पोलिस अधिक तपास करत असून अधिकृत माहितीची प्रतीक्षा आहे.


 Give Feedback



 जाहिराती