सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • धक्कादायक! डोळ्यादेखत चार एक गव्हाची झाली राखरांगोळी, शेतकऱ्याने फोडला टाहो, परभणीतील शेतकऱ्याला मोठा फटका
  • 'सरकारने खरात प्रकरणात प्रामाणिकपणे कारवाई केली तर डझनभर मंत्री तुरुंगात जातील’, काँग्रेसच्या बड्या नेत्याचा दावा
  • इच्छामरणाच्या परवानगीनंतर 31 वर्षीय हरीश राणा अनंतात विलीन; वडील हात जोडून म्हणाले, 'अजिबात रडायचं नाही, माझ्या मुलाला..' जातानाही अवयवदान करत 6 जणांना 'आयुष्य' देत गेला
  • रेस्टॉरंटमध्ये पनीर म्हणून चीज ॲनॉलॉग दिलं जातंय; आमदाराने विधानसभेतच सांगितलं हॉटेलमधलं गौडबंगाल
 DIGITAL PUNE NEWS

'संगीत अष्टनायिका’ कार्यक्रम २८ फेब्रुवारी रोजी

डिजिटल पुणे    25-02-2026 10:43:48

पुणे : भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत ‘संगीत अष्टनायिका’ हा विशेष कार्यक्रम शनिवार, दिनांक २८ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता सादर होणार आहे. संगीत नाटकांतील विविध भावछटा व्यक्त करणाऱ्या आठ  नायिकांचे दर्शन घडविणारा हा आगळावेगळा सांगीतिक उपक्रम ठरणार आहे.भारतीय विद्या भवनचे सरदार महादेव बळवंत नातू सभागृह, सेनापती बापट रस्ता येथे हा कार्यक्रम होणार आहे. 

ज्येष्ठ गायिका जयमाला शिलेदार यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात भक्ती पागे, सावनी दातार–कुलकर्णी, धनश्री खरवंडीकर आणि अस्मिता चिंचाळकर या कलाकार विविध नायिकांच्या भूमिका आणि पदे सादर करणार आहेत. कार्यक्रमाची संकल्पना दीप्ती  भोगले यांची असून निवेदन वर्षा जोगळेकर करणार आहेत.संगीत साथ लीलाधर चक्रदेव आणि विद्यानंद  देशपांडे करणार आहेत. भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित हा कार्यक्रम क्रमांक २८४ असून प्रवेश विनामूल्य असल्याची माहिती प्रा. नंदकुमार काकिर्डे यांनी दिली.       


 Give Feedback



 जाहिराती