सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात रोहित पवार-पोलिसांमध्ये खडाजंगी; डीजीसीएविरोधात FIR नोंदवण्यास नकार
  • बारामतीत अजित पवारांच्या मृतदेहाचं पोस्टमार्टेम सुरु असताना केंद्रीय स्तरावर हालचाली, VSR कंपनीला वाचवायचा प्रयत्न, रोहित पवारांचा गंभीर आरोप
  • पुण्यातील वाद चिघळला: “मी एक बुक्की दिली असती तर तो उठला नसता,” हनुमंत पवारांचा इशारा; दामगुडेंचा ‘कृत्यावर ठाम’ दावा
  • सचिवांच्या आदेशानंतरही बहुजन कल्याण विभागाचा ‘अजब’ कारभार; रद्द शाळांच्या पुनर्मूल्यांकनाचे आदेश
  • स्वारगेट अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडेचा कोर्टात अर्ज, म्हणाला, 'मला निर्दोष मुक्त करा'
  • अजितदादांची बारामती सुनेत्रा पवारच सांभाळणार, बारामती पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला, कोअर कमिटीच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय
 राजकारण

बारामती पोटनिवडणूक: सुनेत्रा पवार रिंगणात; राष्ट्रवादी कोअर कमिटीचा निर्णय, पार्थ पवार राज्यसभेसाठी उमेदवार

डिजिटल पुणे    25-02-2026 11:09:24

बारामती (पुणे): राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीची तयारी वेगाने सुरू झाली आहे. निवडणूक आयोगाने विशेष संक्षिप्त मतदारयादी पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर केला असून १ जानेवारी २०२६ पर्यंत नाव नोंदविलेल्या मतदारांना मतदानाचा अधिकार असणार आहे. प्रारूप मतदारयादी १० मार्चला प्रसिद्ध होणार असून त्यानंतर कधीही निवडणुकीची घोषणा होऊ शकते.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीच्या बैठकीत उपमुख्यमंत्री  सुनेत्रा पवार यांना बारामती पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी देण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आल्याची माहिती आहे. पक्षाकडून ही निवडणूक बिनविरोध करण्यावर भर दिला जाणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

पार्थ पवार राज्यसभेसाठी

मुंबईत झालेल्या कोअर कमिटीच्या बैठकीत पार्थ पवार यांना आगामी राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारी देण्याचाही निर्णय घेण्यात आला. ही बैठक प्रफुल पटेल यांच्या निवासस्थानी पार पडली. बैठकीस प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

राष्ट्रीय कार्यकारिणी बैठक लवकरच

२६ फेब्रुवारीला होणाऱ्या राष्ट्रीय अध्यक्ष निवडीसंदर्भात राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक आयोजित करण्याबाबतही चर्चा झाली. वरळी डोम येथे होणाऱ्या या बैठकीत सुनेत्रा पवार यांच्या नावावर राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून शिक्कामोर्तब होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

पहिल्या महिला उपमुख्यमंत्री

अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. भारतीय संविधानातील कलम १६४(४) नुसार, मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर सहा महिन्यांच्या आत संबंधित व्यक्तीने विधानमंडळाचे सदस्य होणे आवश्यक असते. या पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवार बारामती पोटनिवडणूक लढवणार असल्याची माहिती समोर येत आहे.बारामतीतील राजकीय घडामोडींना वेग आला असून आगामी पोटनिवडणुकीकडे राज्याचे लक्ष लागले आहे.


 Give Feedback



 जाहिराती