सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात रोहित पवार-पोलिसांमध्ये खडाजंगी; डीजीसीएविरोधात FIR नोंदवण्यास नकार
  • बारामतीत अजित पवारांच्या मृतदेहाचं पोस्टमार्टेम सुरु असताना केंद्रीय स्तरावर हालचाली, VSR कंपनीला वाचवायचा प्रयत्न, रोहित पवारांचा गंभीर आरोप
  • पुण्यातील वाद चिघळला: “मी एक बुक्की दिली असती तर तो उठला नसता,” हनुमंत पवारांचा इशारा; दामगुडेंचा ‘कृत्यावर ठाम’ दावा
  • सचिवांच्या आदेशानंतरही बहुजन कल्याण विभागाचा ‘अजब’ कारभार; रद्द शाळांच्या पुनर्मूल्यांकनाचे आदेश
  • स्वारगेट अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडेचा कोर्टात अर्ज, म्हणाला, 'मला निर्दोष मुक्त करा'
  • अजितदादांची बारामती सुनेत्रा पवारच सांभाळणार, बारामती पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला, कोअर कमिटीच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय
 जिल्हा

खाकीचं स्वप्न अधुरंच! रेल्वे पोलीस भरतीदरम्यान धावण्याच्या चाचणीत उमेदवाराचा मृत्यू

डिजिटल पुणे    25-02-2026 12:05:48

मुंबई : रेल्वे पोलीस भरती प्रक्रियेदरम्यान मुंबईत एक हृदयद्रावक घटना घडली आहे. धावण्याच्या मैदानी चाचणीत सहभागी झालेल्या बुलढाणा जिल्ह्यातील 30 वर्षीय अक्षय मिसाळ यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.सोमवारी सकाळी सुमारे 10 वाजण्याच्या सुमारास घाटकोपर पूर्व येथील रेल्वे पोलीस मैदानावर 1,600 मीटर धावण्याची चाचणी पार पाडल्यानंतर अक्षय अचानक बेशुद्ध पडले. उपस्थित अधिकाऱ्यांनी तातडीने त्यांना उपचारासाठी राजावाडी रुग्णालय येथे दाखल केले. मात्र वैद्यकीय उपचार सुरू असतानाच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

या घटनेनंतर पंतनगर पोलीस ठाणे येथे आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. प्राथमिक तपासात कोणताही संशयास्पद प्रकार आढळलेला नसल्याची माहिती पोलिसांनी दिली. शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.

माहितीनुसार, अक्षय यांनी यंदा तिसऱ्यांदा रेल्वे पोलीस भरतीसाठी अर्ज केला होता. खाकी वर्दीचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली होती. मात्र नियतीने साथ न दिल्याने भरतीच्या मैदानावरच त्यांची जीवनयात्रा संपली.या घटनेमुळे भरती प्रक्रियेत सहभागी इतर उमेदवारांमध्येही हळहळ व्यक्त केली जात आहे.


 Give Feedback



 जाहिराती