सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात रोहित पवार-पोलिसांमध्ये खडाजंगी; डीजीसीएविरोधात FIR नोंदवण्यास नकार
  • बारामतीत अजित पवारांच्या मृतदेहाचं पोस्टमार्टेम सुरु असताना केंद्रीय स्तरावर हालचाली, VSR कंपनीला वाचवायचा प्रयत्न, रोहित पवारांचा गंभीर आरोप
  • पुण्यातील वाद चिघळला: “मी एक बुक्की दिली असती तर तो उठला नसता,” हनुमंत पवारांचा इशारा; दामगुडेंचा ‘कृत्यावर ठाम’ दावा
  • सचिवांच्या आदेशानंतरही बहुजन कल्याण विभागाचा ‘अजब’ कारभार; रद्द शाळांच्या पुनर्मूल्यांकनाचे आदेश
  • स्वारगेट अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडेचा कोर्टात अर्ज, म्हणाला, 'मला निर्दोष मुक्त करा'
  • अजितदादांची बारामती सुनेत्रा पवारच सांभाळणार, बारामती पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला, कोअर कमिटीच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय
 राजकारण

“अजितदादांना न्याय मिळेल का?”; मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात आक्रमक झाल्यानंतर रोहित पवारांचा इशारा

डिजिटल पुणे    25-02-2026 16:47:07

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील मृत्यूची सखोल चौकशी व्हावी आणि जबाबदारांवर गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी आमदार रोहित पवार आणि आमदार अमोल मिटकरी यांनी मुंबईतील मरीन ड्राइव्ह पोलिस स्टेशन येथे जोरदार भूमिका घेतली. यावेळी पोलीस ठाण्यात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आले आहेत.

अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूबाबत पुरावे उपलब्ध असतानाही पोलीस प्रशासनाकडून एफआयआर नोंदवला जात नसल्याचा आरोप करत संबंधित अधिकारी आणि कंपनीविरुद्ध तातडीने कारवाईची मागणी करण्यात आली. या प्रकरणात निष्काळजीपणाचा ठपका ठेवणारा DGCA चा अहवाल आल्यानंतरही गुन्हा दाखल न झाल्याने संताप व्यक्त करण्यात आला.

रोहित पवार यांनी सांगितले की, तक्रारीवर त्यांचा जबाब नोंदवण्याची प्रक्रिया सुरू झाली होती; मात्र वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हस्तक्षेपानंतर एफआयआर नोंदवण्यास नकार देण्यात आला आणि केवळ अर्ज स्वीकारण्यात आला. पोलिसांकडून देण्यात आलेल्या पत्रात तक्रारीनुसार तपास करून कायदेशीर कारवाई केली जाईल, असे नमूद करण्यात आले आहे.

सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया

रोहित पवार यांनी आपल्या सोशल मीडियावरील पोस्टमध्ये म्हटले आहे की, अपघातासाठी संबंधित कंपनीचा निष्काळजीपणा कारणीभूत असल्याचा अहवाल आल्यानंतरही एफआयआर नोंदवला जात नसल्याने संशय अधिकच वाढत आहे. विरोधी आणि सत्ताधारी पक्षातील लोकप्रतिनिधींनी मागणी करूनही पोलिसांकडून दखल घेतली जात नसल्यास हे दुर्दैवी असल्याचे त्यांनी नमूद केले.

सरकार आणि यंत्रणा कोणाला तरी वाचवत असल्याची भावना निर्माण होत असून “अजितदादांना न्याय मिळेल का?” असा प्रश्न उपस्थित होत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मात्र हा विषय तडीस नेल्याशिवाय मागे हटणार नसल्याचा इशाराही त्यांनी दिला.

बारामतीत पुन्हा प्रयत्न

दरम्यान, उद्या सकाळी ९ वाजता बारामती तालुका पोलीस ठाण्यात जाऊन एफआयआर दाखल करण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याची माहिती रोहित पवार यांनी दिली. “आमचा कायदेशीर हक्क वापरणारच,” असे सांगत पुढील भूमिका परिस्थितीनुसार ठरवली जाईल, असेही त्यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.या घडामोडींमुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली असून, या प्रकरणात पुढे काय घडते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


 Give Feedback



 जाहिराती