सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात रोहित पवार-पोलिसांमध्ये खडाजंगी; डीजीसीएविरोधात FIR नोंदवण्यास नकार
  • बारामतीत अजित पवारांच्या मृतदेहाचं पोस्टमार्टेम सुरु असताना केंद्रीय स्तरावर हालचाली, VSR कंपनीला वाचवायचा प्रयत्न, रोहित पवारांचा गंभीर आरोप
  • पुण्यातील वाद चिघळला: “मी एक बुक्की दिली असती तर तो उठला नसता,” हनुमंत पवारांचा इशारा; दामगुडेंचा ‘कृत्यावर ठाम’ दावा
  • सचिवांच्या आदेशानंतरही बहुजन कल्याण विभागाचा ‘अजब’ कारभार; रद्द शाळांच्या पुनर्मूल्यांकनाचे आदेश
  • स्वारगेट अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडेचा कोर्टात अर्ज, म्हणाला, 'मला निर्दोष मुक्त करा'
  • अजितदादांची बारामती सुनेत्रा पवारच सांभाळणार, बारामती पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला, कोअर कमिटीच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय
 विश्लेषण

इराणमधील भारतीय नागरिकांना इराण सोडण्याचे तेहरानमधील भारतीय दूतावासाचे आवाहन

डिजिटल पुणे    25-02-2026 18:13:18

मुंबई : भारत सरकारने ५ जानेवारी २०२६ रोजी जारी केलेल्या सूचनेच्या अनुषंगाने आणि इराणमधील बदलती परिस्थिती लक्षात घेता, सध्या इराणमध्ये असलेल्या भारतीय नागरिकांना (विद्यार्थी, यात्रेकरू, व्यापारी आणि पर्यटक) उपलब्ध वाहतुकीच्या साधनांनी, ज्यामध्ये व्यावसायिक विमान सेवांचा समावेश आहे, त्याद्वारे इराण सोडण्याचा सल्ला तेहरानमधील भारतीय दूतावासामार्फत देण्यात आला आहे.

१४ जानेवारी २०२६ रोजीच्या सूचनेनुसार सर्व भारतीय नागरिक आणि भारतीय वंशाच्या व्यक्तींनी (PIOs) योग्य खबरदारी बाळगावी, आंदोलने किंवा निदर्शने होणाऱ्या भागांत जाणे टाळावे, इराणमधील भारतीय दूतावासाच्या संपर्कात राहावे आणि स्थानिक घडामोडींसाठी स्थानिक प्रसारमाध्यमांवर लक्ष ठेवावे.

इराणमधील सर्व भारतीय नागरिकांनी पासपोर्ट आणि ओळखपत्रांसह आपली प्रवास आणि इमिग्रेशन कागदपत्रे स्वतःकडे तयार ठेवावीत. यासंदर्भात कोणत्याही मदतीसाठी त्यांनी भारतीय दूतावासाशी संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

इराणमध्ये असलेल्या ज्या भारतीय नागरिकांनी अद्याप भारतीय दूतावासाच्या लिंकवर (https://www.meaers.com/request/home ) नोंदणी केलेली नाही, त्यांनी ती करुन घ्यावी. ही लिंक दूतावासाच्या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे. इराणमधील इंटरनेट व्यत्ययामुळे एखादा भारतीय नागरिक नोंदणी करु शकत नसेल तर त्यांच्या भारतातील कुटुंबीयांनी ही नोंदणी करावी असे आवाहन तेहरानमधील भारतीय दुतावासामार्फत करण्यात आले आहे.

भारतीय दूतावासाचे आपत्कालीन संपर्क क्रमांक आणि ईमेल:-

मोबाईल क्रमांक: +९८९१२८१०९११५; +९८९१२८१०९१०९; +९८९१२८१०९१०२; +९८९९३२१७९३५९.

ईमेल : [email protected]


 Give Feedback



 जाहिराती