सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • टिपू सुलतानाने 75 हजार हिंदूंची कत्तल केली, पण आपल्याला वर्षानुवर्षे खोटा इतिहास शिकवला गेला: देवेंद्र फडणवीस
  • अजितदादांच्या अपघातानंतर एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय, व्हीएसआर कंपनीच्या विमानात कोणीच बसणार नाही
  • बारामतीत रोहित पवारांचा आक्रमक पवित्रा; डीजीसीए व व्हीएसआर कंपनीविरोधात एफआयआर नोंदवण्यास पोलिसांचा नकार
  • पुण्यात थकीत ई-चलनांवर कडक कारवाई; ३० दिवसांत दंड न भरल्यास ड्रायव्हिंग लायसन्स निलंबित होणार
  • मुंबईत पोलिसांनी उडवून लावलं, रोहित पवार-युगेंद्र पवार वकिलांची अख्खी फौज घेऊनच बारामती पोलीस ठाण्यात पोहोचले
  • जो गेला तो साधा माणूस नव्हता, महाराष्ट्राचा तारणहार होता, FIR घेतलीच पाहिजे; बारामती पोलीस स्टेशनबाहेर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी
 क्राईम

पुणे गुन्हे शाखेची धडक कारवाई; सराईत आरोपीकडून गावठी पिस्टल जप्त

डिजिटल पुणे    26-02-2026 18:25:19

पुणे : पुणे शहर पोलीस यांच्या गुन्हे शाखेअंतर्गत खंडणी विरोधी पथक १ ने मोठी कारवाई करत सराईत गुन्हेगाराकडून गावठी पिस्टल व जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. ही कारवाई आंबेगाव पठार परिसरात करण्यात आली.खंडणी विरोधी पथक १ चे अधिकारी व अंमलदार पुणे शहर आयुक्तालय हद्दीत विना परवाना शस्त्र बाळगणारे, रेकॉर्डवरील पाहिजे व फरारी आरोपींचा शोध घेत पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी पोलीस हवालदार सचिन माळवे व पोलीस शिपाई दयानंद तेलंगे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, भारती विद्यापीठ पोलीस ठाणे हद्दीतील रेकॉर्डवरील आरोपी संकेत चोरघे याच्याकडे पिस्टल आहे.

मिळालेल्या माहितीनुसार संकेत चोरघे हा सर्वे नं. १६/१, आंबेगाव पठार, साई सिध्दी अपार्टमेंट येथे वास्तव्यास असून त्याचे आंबेगाव पठार, तुकाई दर्शन व सिंहगड कॉलेज परिसरात येणे-जाणे असल्याचे समोर आले. २४ फेब्रुवारी २०२६ रोजी तो सिंहगड कॉलेज कॅम्पस, वडगाव बु. येथे आल्याची माहिती मिळताच पथकाने सापळा रचला; मात्र तो दुचाकीवरून पसार झाला.त्यानंतर पोलिसांनी रात्रभर सापळा लावून २५ फेब्रुवारी २०२६ रोजी आंबेगाव पठार येथून संकेत गौरख चोरघे (वय २३) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून १ गावठी पिस्टल व मॅगझिनमध्ये १ जिवंत काडतूस असा एकूण ३५ हजार २०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. ७२/२०२६ अन्वये आर्म अॅक्ट कलम ३ (२५) तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७ (१)(३) सह १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.ही कारवाई अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) पंकज देशमुख, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) निखील पिंगळे व सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे शाखा) शंकर खटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विश्वजीत काईगडे यांच्या सूचनेनुसार सहायक पोलीस निरीक्षक राजेश माळेगावे व त्यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.


 Give Feedback



 जाहिराती