सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • दिल्लीतील मद्य घोटाळ्याप्रकरणी दिल्ली कोर्टातून निर्दोष मुक्तता, केजरीवाल हमसून रडले, म्हणाले, 'आम्ही नेहमी सांगायचो ...'
  • टिपू सुलतानाने 75 हजार हिंदूंची कत्तल केली, पण आपल्याला वर्षानुवर्षे खोटा इतिहास शिकवला गेला: देवेंद्र फडणवीस
  • अजितदादांच्या अपघातानंतर एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय, व्हीएसआर कंपनीच्या विमानात कोणीच बसणार नाही
 जिल्हा

कोकण ज्ञानपीठ महाविद्यालय उरण चा राज्यस्तरीय सन्मान

विठ्ठल ममताबादे ( प्रतिनिधी )    27-02-2026 10:43:22

उरण : महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग माहिती तंत्रज्ञान केंद्र आणि कोकण ज्ञानपीठ उरण वाणिज्य व कला महाविद्यालय उरण, जिल्हा रायगड, यांच्या संयुक्त विद्यमाने सन २०२५- २६ मध्ये विविध उपक्रम आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमांमध्ये महाविद्यालयाने उत्तुंग  यश मिळवले आहे. त्यामुळे महाविद्यालयाला विविध पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलेले आहे. दिनांक २५/२/२०२६  रोजी यशवंतराव चव्हाण सभागृह मुंबई येथे महाराष्ट्राचे उद्योग मंत्री उदय सावंत,रवींद्र साठे सभापती खादी ग्रामोद्योग महामंडळ महाराष्ट्र यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम पार पडला. सदर कार्यक्रमात महाविद्यालयास उत्कृष्ट जिल्हास्तरीय महाविद्यालय द्वितीय क्रमांक, उत्कृष्ट करिअर संसद जिल्हास्तरीय तृतीय क्रमांक देऊन सन्मानित करण्यात आले.

करियर कट्टा अंतर्गत ए.डब्ल्यू. एस. करिअर टूर या विशेष प्रशिक्षण कार्यक्रमात महाविद्यालयास द्वितीय पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. त्याचप्रमाणे सोलर एनर्जी  जनजागृती २०२५- २६ मध्ये जिल्हास्तरीय प्रथम क्रमांक, तसेच शंभर टक्के सोलार एनर्जी जनजागृती चे प्रमाणपत्र देऊन महाविद्यालयाचा गौरव करण्यात आला. पावसाळ्यामध्ये मराठवाडा विभागात पूर परिस्थितीमुळे पूरग्रस्त विद्यार्थ्यांच्या शिक्षणात कोणतेही बाधा येऊ नये म्हणून महाविद्यालयाने मोठ्या प्रमाणात आर्थिक योगदान केले होते. म्हणून राज्यस्तरावर महाविद्यालयास प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. महाविद्यालयाचे करियर कट्टा जिल्हा समन्वयक डॉ. प्रा. हनुमंतराव जगताप यांना राज्यस्तरीय विशेष कामगिरीबद्दल विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात महाविद्यालयात करियर कट्टा अंतर्गत  यशवंत शितोळे अध्यक्ष करियर कट्टा महाराष्ट्र राज्य  आणि प्राचार्य डॉ. वाल्मिक गरजे  यांच्या मार्गदर्शनातून आणि सहकार्यातून विविध उपक्रम घेण्यात आले होते. तसेच आय क्यू एसी समन्वयक डॉ. ए. आर. चव्हाण, जेष्ठ प्राध्यापक व्ही. एस. इंदुलकर , एन एस एस समन्वयक डॉ.डी. पी. हिंगमिरे, अकाउंट्स अँड फायनान्स विभागातील सर्व प्राध्यापक, कला शाखेतील सर्व प्राध्यापक, सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. पी आर कारुळकर, क्रीडा विभाग प्रमुख डॉ. प्रा. आनंद गायकवाड, ग्रंथालय प्रमुख श्याम धारासुरकर आणि महाविद्यालयीन प्रशासकीय कर्मचारी या सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभले. सर्व विद्यार्थ्यांनी उत्तम प्रकारे विविध उपक्रमांमध्ये सहभाग घेतला. आणि विविध विभागात प्राविण्य मिळवले. रायगड जिल्हा करिअर कट्टा समन्वयक म्हणून डॉ. हनुमंतराव जगताप तालुका समन्वयक म्हणून डॉ. डी.पी. हिंगमिरे उत्तम प्रकारे कार्य करीत आहेत. वरील प्रकारे महाविद्यालयाला यश मिळाल्यामुळे संस्थेचे पदाधिकारी, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्यावर सर्वच स्तरातून  शुभेच्छा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.


 Give Feedback



 जाहिराती