सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • दिल्लीतील मद्य घोटाळ्याप्रकरणी दिल्ली कोर्टातून निर्दोष मुक्तता, केजरीवाल हमसून रडले, म्हणाले, 'आम्ही नेहमी सांगायचो ...'
  • टिपू सुलतानाने 75 हजार हिंदूंची कत्तल केली, पण आपल्याला वर्षानुवर्षे खोटा इतिहास शिकवला गेला: देवेंद्र फडणवीस
  • अजितदादांच्या अपघातानंतर एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय, व्हीएसआर कंपनीच्या विमानात कोणीच बसणार नाही
 शहर

पुणे शहर पोलीसांचा “तक्रार निवारण दिन” २८ फेब्रुवारीला; नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन

डिजिटल पुणे    27-02-2026 10:49:02

पुणे : पुणे शहर पोलीस यांच्या वतीने नागरिकांच्या तक्रारींचे जलद निवारण करण्यासाठी दर शनिवारी “तक्रार निवारण दिन” आयोजित करण्यात येत आहे. मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर यांनी त्यांच्या अधिपत्याखालील सर्व प्रादेशिक अपर पोलीस आयुक्त, परिमंडळीय पोलीस उप-आयुक्त, विभागीय सहाय्यक पोलीस आयुक्त तसेच संबंधित पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना त्यांच्या हद्दीतील पोलीस स्टेशन येथे हा उपक्रम राबविण्याचे आदेश दिले आहेत.

याच अनुषंगाने शनिवार, दिनांक २८ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १०.३० ते दुपारी १.३० या वेळेत शहरातील विविध पोलीस स्टेशनमध्ये “तक्रार निवारण दिन” पार पडणार आहे. संबंधित परिमंडळातील पोलीस उप-आयुक्त व सहाय्यक पोलीस आयुक्त स्वतः उपस्थित राहून नागरिकांच्या तक्रारी ऐकून त्यांचे निवारण करतील.

विविध परिमंडळांतील प्रमुख पोलीस स्टेशन पुढीलप्रमाणे:

परिमंडळ १: विश्रामबाग, फरासखाना, शिवाजीनगर

परिमंडळ २: आंबेगाव, विश्रामबाग

परिमंडळ ३: उत्तमनगर, स्वारगेट

परिमंडळ ४: बाणेर

परिमंडळ ५: कोरेगाव पार्क, कोथरुड

परिमंडळ ६: काळेपडळ

परिमंडळ ७: लोणीकंद, खडकी

विशेष शाखा: कोथरुड, येरवडा

वाहतूक विभाग: विश्रांतवाडी

मुख्यालय: चिबवेवाडी, लष्कर

गुन्हे शाखा: हडपसर, मुंढवा

आर्थिक व सायबर गुन्हे शाखा: संबंधित विभागीय कार्यालय

फरासखाना विभाग: सहकारनगर, भारती विद्यापीठ, मार्केटयार्ड, सिंहगड रोड, चतुश्रृंगी, लक्ष्मीनगर, कोंढवा बुद्रुक, येवलेवाडी, लोणीकाळभोर, फुरसुंगी, वाघोली, खराडी इत्यादी.

ज्या ठिकाणी सहाय्यक पोलीस आयुक्त किंवा पोलीस उप-आयुक्त उपस्थित राहू शकणार नाहीत, त्या ठिकाणी संबंधित पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तक्रार निवारण प्रक्रियेची अंमलबजावणी करतील.

 नागरिकांना आवाहन:

ज्यांचे तक्रार अर्ज प्रलंबित आहेत किंवा स्थानिक पातळीवरील समस्या आहेत, त्यांनी संबंधित पोलीस स्टेशन येथे दिलेल्या वेळेत उपस्थित राहून आपल्या तक्रारी मांडाव्यात, असे आवाहन पुणे शहर पोलीसांकडून करण्यात आले आहे.


 Give Feedback



 जाहिराती