सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • कोणीतरी नेता सुनेत्रा काकींच्या खांद्यावर हात टाकतो, कोणीतरी ओढतो; रोहित पवारांचा राष्ट्रवादीतील 'चौकडी'वर हल्लाबोल
  • भारतीय क्रिकेटपटू रिंकू सिंहच्या वडिलांचे निधन, कर्करोगाशी झुंज अपयशी, नोएडातील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
  • तुम्ही नवे पर्व सुरु झालं म्हणता, पण अजितपर्व कधीच संपणार नाही, रोहित पवारांचा सुनील तटकरेंवर हल्लाबोल
  • दिल्लीतील मद्य घोटाळ्याप्रकरणी दिल्ली कोर्टातून निर्दोष मुक्तता, केजरीवाल हमसून रडले, म्हणाले, 'आम्ही नेहमी सांगायचो ...'
 क्राईम

पिंपरीत 20 रुपयांच्या वादातून मित्रावर जीवघेणा हल्ला; आरोपीला लातूरमधून अटक

डिजिटल पुणे    27-02-2026 12:24:21

पिंपरी-चिंचवड : पिंपरी चिंचवडमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे, अवघ्या 20 रुपयांसाठी मित्राने मित्राच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार करत हत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना पिंपरी परिसरात घडली आहे. अवघ्या 20 रुपयांच्या उधारीच्या कारणावरून मित्रानेच मित्रावर धारदार शस्त्राने हल्ला केल्याची धक्कादायक घटना पिंपरी परिसरात घडली. या प्रकरणात रवींद्र ज्ञानेश्वर गायकवाड गंभीर जखमी झाले असून, आरोपी सत्यजित उर्फ सोन्या कांबळे याला पिंपरी पोलिसांनी लातूर येथून अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी (दि. 26) सायंकाळी सुमारे 8.15 वाजण्याच्या सुमारास पिंपरी गावातील समृद्धी हॉटेलजवळील लकी कंट्री बार येथे ही घटना घडली. रवींद्र गायकवाड आणि सत्यजित कांबळे हे दोघे एकमेकांच्या परिचयातील असून, ते एकत्र दारू पिण्यासाठी गेले होते. यावेळी 20 रुपयांच्या उधारीवरून त्यांच्यात वाद निर्माण झाला.

वाद चिघळल्यानंतर आरोपी सत्यजित कांबळे याने रवींद्र गायकवाड यांच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात रवींद्र गंभीर जखमी झाले. त्यांना तत्काळ उपचारासाठी वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांचा जबाब नोंदवण्यात आला आहे.

घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला होता. तपासादरम्यान तो पुण्यामार्गे लातूरला गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिस पथकाने लातूर येथे जाऊन आरोपीला ताब्यात घेतले. सध्या त्याला पिंपरी येथे आणण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास करण्यात येत आहे.या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, क्षुल्लक कारणावरून घडलेल्या या प्रकारामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. पिंपरी पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


 Give Feedback



 जाहिराती