सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • कोणीतरी नेता सुनेत्रा काकींच्या खांद्यावर हात टाकतो, कोणीतरी ओढतो; रोहित पवारांचा राष्ट्रवादीतील 'चौकडी'वर हल्लाबोल
  • भारतीय क्रिकेटपटू रिंकू सिंहच्या वडिलांचे निधन, कर्करोगाशी झुंज अपयशी, नोएडातील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
  • तुम्ही नवे पर्व सुरु झालं म्हणता, पण अजितपर्व कधीच संपणार नाही, रोहित पवारांचा सुनील तटकरेंवर हल्लाबोल
  • दिल्लीतील मद्य घोटाळ्याप्रकरणी दिल्ली कोर्टातून निर्दोष मुक्तता, केजरीवाल हमसून रडले, म्हणाले, 'आम्ही नेहमी सांगायचो ...'
 क्राईम

पंधरा महिन्यांपूर्वी चायनीज हॉटेलवर तलवारीने हल्ला करून जबरी चोरी; आरोपी गुन्हे शाखेकडून जेरबंद

डिजिटल पुणे    27-02-2026 14:51:36

पुणे : पंधरा महिन्यांपूर्वी येरवडा परिसरातील चायनीज हॉटेलमध्ये घुसून तलवारीच्या धाकावर गल्ल्यातील रक्कम जबरदस्तीने लंपास करणाऱ्या आरोपीस गुन्हे शाखा युनिट-४ पथकाने अटक केली आहे. संबंधित आरोपीस पुढील कारवाईसाठी येरवडा पोलीस स्टेशन यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

गुन्हे शाखा, पुणे शहर युनिट-४ कडील अधिकारी व अंमलदार हे वरिष्ठांच्या आदेशानुसार रेकॉर्डवरील गुन्हेगारांची पडताळणी व परिसरात पेट्रोलिंग करत होते. दि. २५ फेब्रुवारी २०२६ रोजी पोलीस अंमलदार नागेश कुंवर व विशाल इथापे यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, येरवडा येथील इराणी मार्केटमधील ‘पक्को चायनीज हॉटेल’मध्ये हल्ला करून चोरी करणाऱ्यांपैकी एक इसम भवानी पेठेतील भगवा चौक येथे थांबलेला आहे.

ही माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक कांचन जाधव यांना कळविण्यात आली. त्यांच्या मार्गदर्शनानुसार पथकाने सापळा रचून संशयितास ताब्यात घेतले. चौकशीत त्याने आपले नाव फैसल उर्फ बटाव उस्मान खान (वय ४२, रा. चुडामन तालीम, भवानी पेठ, पुणे) असे सांगितले.

सखोल चौकशीदरम्यान आरोपीने सुमारे १५ महिन्यांपूर्वी आपल्या साथीदारासह बँक ऑफ महाराष्ट्र उमर कॉम्प्लेक्स, इराणी मार्केट, येरवडा येथील पक्को चायनीज हॉटेलमध्ये काऊंटरवरील कर्मचाऱ्यावर तलवारीने हल्ला करून गल्ल्यातील रक्कम जबरदस्तीने चोरून नेल्याची कबुली दिली.

या प्रकरणी येरवडा पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजि. नं. ५६५/२०२४ अन्वये भारतीय न्याय संहिता व आर्म अॅक्टसह विविध कलमांनुसार गुन्हा दाखल असल्याचे स्पष्ट झाले. आरोपीस पुढील कायदेशीर कारवाईसाठी येरवडा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त (गुन्हे) पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त (गुन्हे) निखिल पिंगळे, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे-२) राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली, वरिष्ठ पोलीस निरीक्षक कांचन जाधव, पोलीस उपनिरीक्षक वैभव मगदुम व त्यांच्या पथकाने केली.


 Give Feedback



 जाहिराती