सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • : फिनालेच्या 2 दिवस आधीच बिग बॉस मराठी 6 च्या विजेत्याचं नाव लिक? प्रेक्षकांच्या भुवया उंचावल्या
  • राज्यात पारा 44 अंशांच्या पार; पुढील तीन दिवस महत्त्वाचे, जगातील सर्वाधिक उष्ण शहरांमध्ये महाराष्ट्रतील चार शहर, उष्णतेने नागरिक हैराण
  • पुण्यात बेवारस वाहनांवर होणार कारवाई; २४ तासांत हटवा नाहीतर थेट होणार जप्त, वाहतूक पोलिसांची कारवाई सुरू
  • उष्णतेच्या तीव्रतेत जास्त काम करणे टाळा, 12 ते 4 उन्हात जाणे टाळा; गिरीश महाजनांचे नागरिकांना आवाहन
  • महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना दीर्घकाळ परिणाम भोगावे लागतील, 33 टक्के महिलांना इथं येऊ द्यात: नरेंद्र मोदी
 क्राईम

वाघोलीत अवैध हातभट्टीवर धडाकेबाज कारवाई; ६.३५ लाखांचा मुद्देमाल जप्त

डिजिटल पुणे    27-02-2026 17:37:29

पुणे : गुन्हे शाखा युनिट ७ कडून वाघोली परिसरात अवैध दारू हातभट्टीविरोधात मोठी कारवाई करण्यात आली. मौजे भावडी (ता. हवेली) येथील तांबे यांच्या क्रशर प्लांटजवळ सुरू असलेली गावठी हातभट्टी उद्ध्वस्त करून सुमारे ६ लाख ३५ हजार ५७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलीस अंमलदार नितीन धाडगे आणि प्रतिक्षा पानसरे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार ही कारवाई करण्यात आली. पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे (गुन्हे शाखा, युनिट ७) यांच्या पथकाने घटनास्थळी छापा टाकला असता आरोपी महिला अनिशा योगेश गुडदावत (वय २०, रा. ५ नंबर भावडीता, ता. हवेली, जि. पुणे) ही हातभट्टीची राखण करताना आढळून आली.

चौकशीत तिने पतीच्या मदतीने होळी सणाच्या निमित्ताने गावठी दारू तयार करून विक्रीसाठी भट्टी लावल्याची कबुली दिली. छाप्यात १८,१२२ लिटर तुरटी व गुळमिश्रित कच्चे रसायन (अंदाजे किंमत रु. ६,३४,२७०) तसेच इतर साहित्य (रु. १,३००) असा एकूण रु. ६,३५,५७० किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या प्रकरणी वाघोली पोलीस स्टेशन येथे गु.र. नं. १३२/२०२६ दाखल करण्यात आला असून महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ (फ), (ब), (क), (ई) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास वाघोली पोलीस करत आहेत.ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त (गुन्हे) पंकज देशमुख, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) निखिल पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे २) राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे यांच्यासह गुन्हे शाखा युनिट ७ चे अधिकारी व कर्मचारी सहभागी होते.


 Give Feedback



 जाहिराती