सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • कोणीतरी नेता सुनेत्रा काकींच्या खांद्यावर हात टाकतो, कोणीतरी ओढतो; रोहित पवारांचा राष्ट्रवादीतील 'चौकडी'वर हल्लाबोल
  • भारतीय क्रिकेटपटू रिंकू सिंहच्या वडिलांचे निधन, कर्करोगाशी झुंज अपयशी, नोएडातील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
  • तुम्ही नवे पर्व सुरु झालं म्हणता, पण अजितपर्व कधीच संपणार नाही, रोहित पवारांचा सुनील तटकरेंवर हल्लाबोल
  • दिल्लीतील मद्य घोटाळ्याप्रकरणी दिल्ली कोर्टातून निर्दोष मुक्तता, केजरीवाल हमसून रडले, म्हणाले, 'आम्ही नेहमी सांगायचो ...'
 क्राईम

काळेपडळ पोलीस स्टेशनची कारवाई : आरोपीकडून गावठी पिस्टलसह जिवंत काडतुसे जप्त

डिजिटल पुणे    28-02-2026 17:26:39

पुणे : काळेपडळ पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंगदरम्यान पोलिसांनी एका संशयित आरोपीला ताब्यात घेत त्याच्याकडून १ गावठी बनावटीची पिस्टल व २ जिवंत काडतुसे असा एकूण ५१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.

काळेपडळ पोलीस ठाणे हद्दीत अवैध धंदे, अभिलेखावरील गुन्हेगार, तडीपार इसम व अग्निशस्त्र बाळगणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार तपास पथक पेट्रोलिंग करत असताना पोलीस अंमलदार अतुल पंधरकर व शाहीद शेख यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, इरफान मलीक नावाचा इसम दादा गुजर शाळेजवळ, साठेनगरकडे जाणाऱ्या रस्त्यालगत संशयास्पद हालचाली करत उभा आहे व त्याच्याकडे अग्निशस्त्र असण्याची शक्यता आहे.

ही माहिती तपास पथकाचे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक अमित शेटे यांनी वरिष्ठांना कळविल्यानंतर मार्गदर्शनाखाली पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांना पाहताच संशयिताने पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र पाठलाग करून त्याला ताब्यात घेण्यात आले.पंचासमक्ष घेतलेल्या अंगझडतीत आरोपीकडून १ गावठी पिस्टल व २ जिवंत राऊंड जप्त करण्यात आले. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव इरफान रईसउद्दीन मलीक (वय ३२, रा. संकेतविहार, काळेपडळ, पुणे) असे आहे.

या प्रकरणी त्याच्याविरुद्ध भा.न्यायसंहिता कलम ३(२५), ३(५) तसेच मुंबई पोलीस कायदा कलम ३७(१)(३) सह १३५ अन्वये काळेपडळ पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही कारवाई पोलीस उपआयुक्त परिमंडळ ६ डॉ. राजकुमार शिंदे, सहाय्यक पोलीस आयुक्त हडपसर विभाग (अति. कार्य) अनुराधा उदमले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांच्या सूचनेनुसार सहायक पोलीस निरीक्षक अमित शेटे व त्यांच्या पथकाने पार पाडली.सदर कारवाईबद्दल पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक करण्यात येत आहे.


 Give Feedback



 जाहिराती