सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • कोणीतरी नेता सुनेत्रा काकींच्या खांद्यावर हात टाकतो, कोणीतरी ओढतो; रोहित पवारांचा राष्ट्रवादीतील 'चौकडी'वर हल्लाबोल
  • भारतीय क्रिकेटपटू रिंकू सिंहच्या वडिलांचे निधन, कर्करोगाशी झुंज अपयशी, नोएडातील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
  • तुम्ही नवे पर्व सुरु झालं म्हणता, पण अजितपर्व कधीच संपणार नाही, रोहित पवारांचा सुनील तटकरेंवर हल्लाबोल
  • दिल्लीतील मद्य घोटाळ्याप्रकरणी दिल्ली कोर्टातून निर्दोष मुक्तता, केजरीवाल हमसून रडले, म्हणाले, 'आम्ही नेहमी सांगायचो ...'
 विश्लेषण

गुन्हे शाखेच्या विभागीय सहायक पोलीस आयुक्तांच्या पोलीस स्टेशन भेटी; प्रलंबित गुन्हे व तक्रारींचा आढावा

डिजिटल पुणे    28-02-2026 18:47:07

पुणे  : पुणे शहर पोलीस आयुक्तालय अंतर्गत सर्व विभागीय सहाय्यक पोलीस आयुक्तांनी आठवड्यातील सहा दिवस आपल्या विभागातील पोलीस स्टेशनना भेट देण्याच्या सूचना मा. पोलीस आयुक्तांनी दिल्या आहेत. त्यानुसार दिनांक ०२ मार्च २०२६ ते ०७ मार्च २०२६ दरम्यान विविध पोलीस स्टेशनमध्ये नियोजित भेटी पार पडणार आहेत.

या भेटीदरम्यान संबंधित विभागीय सहायक पोलीस आयुक्त प्रलंबित गुन्हे, तक्रार अर्ज, तपासाची स्थिती तसेच नागरिकांच्या अडचणींचा आढावा घेऊन आवश्यक मार्गदर्शन करणार आहेत. विशेषतः दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या प्रकरणांच्या निर्गतीसाठी ठोस सूचना दिल्या जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

शनिवार, ०७/०३/२०२६ रोजी ‘तक्रार निवारण दिन’ म्हणून नागरिकांना पोलीस स्टेशनमध्ये उपस्थित राहून आपल्या तक्रारी मांडण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ज्या नागरिकांचे तक्रार अर्ज किंवा गुन्हे प्रलंबित असतील, त्यांनी संबंधित पोलीस स्टेशनमध्ये उपस्थित राहून अधिकाऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.या उपक्रमामुळे प्रलंबित प्रकरणांच्या जलद निर्गतीला चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे


 Give Feedback



 जाहिराती