सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • : फिनालेच्या 2 दिवस आधीच बिग बॉस मराठी 6 च्या विजेत्याचं नाव लिक? प्रेक्षकांच्या भुवया उंचावल्या
  • राज्यात पारा 44 अंशांच्या पार; पुढील तीन दिवस महत्त्वाचे, जगातील सर्वाधिक उष्ण शहरांमध्ये महाराष्ट्रतील चार शहर, उष्णतेने नागरिक हैराण
  • पुण्यात बेवारस वाहनांवर होणार कारवाई; २४ तासांत हटवा नाहीतर थेट होणार जप्त, वाहतूक पोलिसांची कारवाई सुरू
  • उष्णतेच्या तीव्रतेत जास्त काम करणे टाळा, 12 ते 4 उन्हात जाणे टाळा; गिरीश महाजनांचे नागरिकांना आवाहन
  • महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना दीर्घकाळ परिणाम भोगावे लागतील, 33 टक्के महिलांना इथं येऊ द्यात: नरेंद्र मोदी
 शहर

पुणे शहर पोलीस उप-आयुक्तांची तीन दिवसीय पोलीस स्टेशन तपासणी मोहीम; प्रलंबित गुन्हे व तक्रारींच्या निर्गतीसाठी मार्गदर्शन

डिजिटल पुणे    28-02-2026 18:51:21

पुणे : पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील सर्व परिमंडळीय पोलीस उप-आयुक्त मंगळवार ते गुरुवार (दि. ०३ ते ०५ मार्च २०२६) या कालावधीत त्यांच्या अधिपत्याखालील पोलीस स्टेशनना भेट देणार आहेत. या भेटीदरम्यान संबंधित पोलीस स्टेशन स्तरावर तपासणी करून प्रलंबित गुन्हे व तक्रार अर्जांच्या निर्गतीबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.ही तीन दिवसीय तपासणी मोहीम प्रत्येक परिमंडळात पुढीलप्रमाणे राबविण्यात येणार आहे:

दि. ०३/०३/२०२६ (मंगळवार)

परिमंडळ १ – विश्रामबाग

परिमंडळ २ – भारती विद्यापीठ

परिमंडळ ३ – कोथरूड

परिमंडळ ४ – विश्रांतवाडी

परिमंडळ ५ – वानवडी

परिमंडळ ६ – हडपसर

परिमंडळ ७ – लोणीकंद

दि. ०४/०३/२०२६ (बुधवार)

परिमंडळ १ – फरासखाना

परिमंडळ २ – बिबवेवाडी

परिमंडळ ३ – अलंकार

परिमंडळ ४ – खडकी

परिमंडळ ५ – कोंढवा बुद्रुक/येवलेवाडी

परिमंडळ ६ – काळेपडळ

परिमंडळ ७ – विमानतळ

दि. ०५/०३/२०२६ (गुरुवार)

परिमंडळ १ – खडक

परिमंडळ २ – मार्केटयार्ड

परिमंडळ ३ – नांदेडसिटी

परिमंडळ ४ – येरवडा

परिमंडळ ५ – कोंढवा

परिमंडळ ६ – मांजरी

परिमंडळ ७ – लोहगाव

या भेटीदरम्यान पोलीस उप-आयुक्त संबंधित पोलीस स्टेशनमध्ये प्रत्यक्ष उपस्थित राहून प्रलंबित गुन्हे, तक्रार अर्ज व इतर प्रकरणांचा आढावा घेणार असून, त्याच्या जलद व प्रभावी निर्गतीसाठी मार्गदर्शन करणार आहेत.नागरिकांना आवाहन करण्यात येते की, त्यांच्या तक्रारी किंवा अर्ज प्रलंबित असल्यास संबंधित दिवशी संबंधित पोलीस स्टेशनमध्ये उपस्थित राहून आपली बाजू मांडावी.


 Give Feedback



 जाहिराती