उरण : उरण विधानसभा मतदार संघातील विविध समस्या, प्रश्न सोडविण्यासाठी उरण विधानसभा जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन करण्यात आले असून उरण विधानसभा मतदार संघातील जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी नेहमी प्रयत्नशील राहू, जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी कटीबद्ध राहू असे आश्वासन श्रीरंग आप्पा बारणे यांनी दिले.
शिवसेनेच्या उरण विधानसभा जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन श्रीराजनगर कॉम्प्लेक्स, उरण कामठा रोड, गाडे हॉस्पिटलच्या शेजारी येथे रविवार दि. १ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता करण्यात आले. यावेळी जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन करून खासदार श्रीरंग बारणे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी पनवेल महानगर पालिकेचे नगरसेवक तथा पनवेल विधानसभा रायगड जिल्हा प्रमुख रामदास शेवाळे,उरण विधानसभा रायगड जिल्हा प्रमुख विनोदभाऊ साबळे,अल्पसंख्यांक जिल्हा अध्यक्ष समद भोंगले, जिल्हा युवा अध्यक्ष प्रीतम सुर्वे,जेष्ठ शिव सैनिक मनोहर ठाकूर,रायगड जिल्हाध्यक्ष मेघाताई दमडे,जिल्हा संघटक महेंद्र पाटील,उपजिल्हा अध्यक्ष वैजयंती ठाकूर,तालुका प्रमुख दिपक ठाकूर,उप तालुका प्रमुख महिला रुबीना कुटी,निवडणूक प्रभारी सुनिल भोईर,चाणजे विभाग प्रमुख अक्षय म्हात्रे,उप शहर प्रमुख वीरू चाळके,शाखा प्रमुख संदेश म्हात्रे,गणेश म्हात्रे,दिनेश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी खासदार बारणे म्हणाले कि उरण मतदार संघांमध्ये शिवसेनेची फार मोठी ताकद आहे. हे विसरून चालणार नाही. नाकारता येत नाही.महायुती मधूनच मी पहिल्यांदा खासदार झालो. माझा पक्ष वाढविणे ही माझी जबाबदारी आहे. आम्हाला जनतेचे, सर्वसामान्य नागरिकांसाठी काम करायचे आहे. वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण या विचारानुसार, तत्वानुसार वाटचाल सुरु आहे. त्यानुसार काम केले. कार्यकर्त्यांना नेहमी बळ देण्याचे काम केले.
शिवसेनेचे धनुष्यबाण सर्व सामान्यापर्यंत पोहोचविण्यात यशस्वी झालो. राजकारण निवडणुकी पुरते ठीक आहे. विकास कामासाठी कधीही राजकारण करीत नाही. नेहमी स्थानिक भूमिपुत्रांना मदत करीत आलो आहोत. उरण विधानसभा मतदार संघात सेफ्टी झोन व विविध समस्या सोडविण्याचे काम केले.विविध समस्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. जो पर्यन्त गोर गरिबांचे, बाधीतांचे प्रश्न सुटत नाही तो पर्यंत कार्यरत राहणार. सर्वच निवडणुकीत गेल्या ३ वर्षात महाराष्ट्रात २ नंबरचा पक्ष म्हणून शिवसेना कार्यरत आहे. निवडणुकीत सुद्धा जनतेने शिवसेनेला भरभरून चांगला प्रतिसाद दिला आहे. भविष्यात जनतेसाठी चांगले काम करायचे आहे. जिथे जिथे मदत लागेल तिथे तिथे मी जनतेच्या पाठीशी नेहमी उभा आहे. सर्वांनी हेवे दावे सोडून पक्ष वाढवा. मी तू पणा, स्वतःचा स्वार्थ बाजूला ठेवा. ज्या पद्धतीने उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब जनतेसाठी काम करतात त्या पद्धतीने सर्वांनी उरण मध्ये काम करा. शिवसेना असा पक्ष आहे जो सर्वांना न्याय देतो, सर्वांच्या समस्या सोडवितो.
सर्वांना सामावून घेतो असा पक्ष शिवसेना आहे. कार्यालयाचे उदघाटन झाले याचा मला सार्थ अभिमान आहे. उरण विधानसभा मतदार संघातील सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांचे मी आभार मानतो. निश्चितच या कार्यालयातून जनतेचे, गोर गरिबांचे प्रश्न समस्या सोडविले जातील असे मत व्यक्त करत खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या.या प्रसंगी विविध पक्षातील शेकडो पदाधिकारी कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर पक्ष प्रवेश केला.सदर कार्यक्रमाचे उत्तम असे सूत्रसंचालन राजेश पाटील तर आभार प्रदर्शन शहर अध्यक्ष सुलेमान शेख यांनी केले. एकंदरीत शिवसेना पक्ष कार्यलयाचे उदघाटन मोठया उत्साहात, उत्तम प्रतिसादात संपन्न झाले.