सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • अमेरिका, इस्त्रायल आणि इराण युद्धाचा फटका, सोने- चांदीच्या दरवाढीचा भडका, सोन्याचे दर 7372 रुपयांनी वाढले
  • नागपूर स्फोट प्रकरण : निष्काळजीपणाची प्राथमिक नोंद; मृतांच्या कुटुंबीयांना ८२ लाखांची मदत जाहीर – चंद्रशेखर बावनकुळे
  • अमेरिका अन् इराण युद्धाचा फटका, जळगावातील केळी उत्पादक शेतकरी चिंतेत
  • इस्रायल-अमेरिका-इराण तणावाचा जागतिक बाजारांवर परिणाम; सेन्सेक्स 80 हजारांखाली, निफ्टीतही मोठी घसरण
  • मोठी बातमी! पुण्यातील कॉलेजचे 80 विद्यार्थी दुबईत अडकले; पालक चिंतेत, शैक्षणिक सहलीनिमित्तच दौरा
  • मोठी बातमी! महायुतीचं मुंबईकरांना मोठं गिफ्ट; मालमत्ता करात तब्बल 700 स्क्वेअर फूटापर्यंत करमाफी
 जिल्हा

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिली लंगरसेवा ;‘हिंद-दी-चादर’ समागम कार्यक्रमात भक्तिभावाचा अनोखा संदेश

डिजिटल पुणे    02-03-2026 16:36:59

नवी मुंबई:  केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी खारघर, नवी मुंबई येथे आयोजित ‘हिंद-दी-चादर’ समागम कार्यक्रम दरम्यान स्वतः लंगरमध्ये संत महंताना भोजन वाढून सेवा दिली.  ‘सेवा हीच खरी श्रद्धा’ या शीख परंपरेचा आदर्श त्यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही भोजन वाढून लंगर सेवा दिली.

कार्यक्रमस्थळी सकाळपासून रात्रीपर्यंत अखंड लंगर सुरू असून सर्वधर्मीय भाविकांसाठी विनामूल्य भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. आठ ठिकाणी सुरू असलेल्या लंगरमध्ये हजारो स्वयंसेवक सेवा बजावत आहेत. भाई जैताजी लंगर सेवा, राधास्वामी ब्यास लंगर सेवा, बाबा मक्खन शाह लबाना लंगर सेवा, संत सेवालाल महाराज लंगर सेवा, बाबा दीप सिंघा ब्यास लंगर सेवा, भगवान झुलेलालजी लंगर सेवा, भाई मतीदासजी लंगर सेवा या आठ सेवादार लंगरमध्ये पहिल्या दिवशी लाखो भाविकांनी लंगरचा लाभ घेतला, तर दुसऱ्या दिवशी हा प्रतिसाद अधिक वाढला असल्याची माहिती आयोजकांनी दिली.

या समागम कार्यक्रमात गुरु ग्रंथ साहिब यांच्या पावन उपस्थितीत कीर्तन व धार्मिक कार्यक्रम सुरू होते. “वाहे गुरु” आणि “बोले सो निहाल, सत श्री अकाल”च्या जयघोषात भाविकांनी दर्शन व लंगर सेवेचा लाभ घेत घेतला.लंगर ही केवळ भोजन व्यवस्था नसून समता, बंधुता आणि मानवतेचा संदेश देणारी परंपरा आहे. गृहमंत्री आणि मुख्यमंत्री यांनी स्वतः लंगर सेवा देत या परंपरेचा सन्मान केला. ‘हिंद-दी-चादर’ समागमातून सामाजिक ऐक्य आणि एकात्मतेचा प्रभावी संदेश दिला.


 Give Feedback



 जाहिराती