पुणे : रॅपिड7ने पुण्यात ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर (जीसीसी) सुरू केले, जे एआय-आधारित सायबर सुरक्षेमध्ये मोठी गुंतवणूक दर्शवते. या नव्या केंद्रातून नवकल्पना, उत्कृष्ट अभियांत्रिकी कामगिरी आणि सातत्यपूर्ण व्यवस्थापित सुरक्षा सेवा यावर भर दिला जाणार आहे. पुणे येथील या हबमध्ये तंत्रज्ञान, सुरक्षा ऑपरेशन्स, ग्राहक सहाय्य आणि आयटी टीम्स काम करतील. यामुळे एआय क्षेत्रातील नवकल्पना, प्रादेशिक वाढ आणि स्थानिक पातळीवर सायबर भागीदारी अधिक मजबूत होईल.
रॅपिड7 ची टीम वाढत असल्यामुळे, पुण्यातील नवीन कार्यालय खास नियोजन करून तयार करण्यात आले आहे. येथे आधुनिक सहकार्य क्षेत्रे, एकमेकांशी संवाद साधण्यासाठी स्वतंत्र जागा, अत्याधुनिक आणि आरामदायी (एर्गोनॉमिक) कामाच्या सुविधा उपलब्ध आहेत. तसेच आजूबाजूला चांगल्या सामाजिक सुविधा आणि इमारतीत आवश्यक सर्व सोयी उपलब्ध आहेत. हे कार्यालय प्रयोग करण्यासाठी, ग्राहकांशी संपर्क वाढवण्यासाठी, समुदाय निर्माण करण्यासाठी आणि सतत शिकण्यासाठी एक मुख्य केंद्र बनेल, जे रॅपिड7च्या जागतिक संस्कृतीच्या महत्त्वपूर्ण स्तंभांपैकी एक आहे.
ही गुंतवणूक तीन स्पष्ट वचनबद्धतांचेही प्रतीक आहे:
१. भारत – जागतिक सायबर नवकल्पनांचे केंद्र
रॅपिड7 पुणे शहराला एआय-आधारित सायबरसुरक्षा नवकल्पनांसाठी महत्त्वाचे केंद्र बनवत आहे. हे रॅपिड7 कमांड प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून केले जात आहे. हा प्लॅटफॉर्म एआयच्या मदतीने एक्स्पोजर मॅनेजमेंट आणि डिटेक्शन अँड रिस्पॉन्स यांना एकत्र करतो. ते ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर थेट एआय-फर्स्ट प्लॅटफॉर्मला पुढे नेण्यासाठी मदत करते, ज्यामुळे ग्राहकांना त्यांच्या संपूर्ण अटॅक सरफेसवर प्रभावी नियंत्रण मिळते. पुण्यातील सिक्युरिटी ऑपरेशन्स सेंटर (एसओसी) जागतिक ग्राहकांसाठी सतत देखरेख आणि तत्काळ प्रतिसाद सेवा देईल. यामुळे रॅपिड7चा प्रीएम्प्टिव्ह एमडीआर मॉडेल अधिक मजबूत होईल.
२. पुढील पिढीतील सायबर तज्ज्ञ घडवणे
भारतामध्ये जगातील सर्वोत्तम अभियांत्रिकी कौशल्य असलेले मोठे मनुष्यबळ उपलब्ध आहे. रॅपिड7 सायबरसुरक्षा ऑपरेशन्स, एआय अभियांत्रिकी, उत्पादन विकास आणि विद्यापीठांशी भागीदारी यामध्ये सक्रियपणे गुंतवणूक करत आहे, जेणेकरून भविष्यासाठी सक्षम आणि दीर्घकालीन कौशल्यसाखळी तयार होईल. हा उपक्रम नवीन सायबर धोक्यांची समज असलेल्या आणि जबाबदारीने एआय वापरणाऱ्या कुशल व्यावसायिकांद्वारे नवकल्पना पुढे नेण्याची खात्री देतो.
३. स्थानिक आणि केंद्र सरकारसोबत सहकार्य
भारत आपली सायबर सुरक्षितता अधिक मजबूत करत असताना, रॅपिड7 स्थानिक आणि केंद्र सरकारच्या संबंधित भागीदारांसोबत सहकार्य करण्यास तयार आहे. एक्स्पोजरची स्पष्ट माहिती आणि डिटेक्शन-रिस्पॉन्स क्षमता एकत्र करून, रॅपिड7 सार्वजनिक क्षेत्रातील संस्थांना फक्त हल्ल्यानंतर प्रतिक्रिया देणाऱ्या सुरक्षेऐवजी सातत्यपूर्ण आणि मजबूत सुरक्षा प्रणालीकडे जाण्यास मदत करते. पुण्यातील ही गुंतवणूक या उपक्रमाला पाठबळ देते. डिजिटल बदल वेगाने होत असताना, सायबर सुरक्षेची ताकद वाढवण्यासाठी हे केंद्र महत्त्वाची भूमिका बजावेल.
पी. अनबालागन, प्रिन्सिपल सेक्रेटरी (उद्योग, गुंतवणूक आणि सेवा विभाग), महाराष्ट्र शासन यांनी रॅपिड7च्या पुण्यातील ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटरच्या उद्घाटनावेळी सांगितले: “पुण्यात रॅपिड7चे जीसीसी सुरू होणे हे महाराष्ट्राला जागतिक तंत्रज्ञान केंद्र बनण्याच्या प्रवासात एक महत्त्वाचे पाऊल आहे. अलीकडेच रॅपिड7च्या टीमने माननीय मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर या भागीदारीला गती मिळाली. त्या योजना इतक्या लवकर प्रत्यक्षात येऊन जागतिक दर्जाच्या सुविधेत रूपांतरित झाल्याचे पाहून खूप आनंद वाटतो.”
चर्चेतून थेट उद्घाटनापर्यंत झालेला हा जलद प्रवास आपल्या राज्यातील व्यवसाय सुलभतेचे (‘ईज ऑफ डुइंग बिझनेस’) एक उत्तम उदाहरण आहे. आमच्या ‘मैत्री’ या सिंगल-विंडो पोर्टलसारख्या उपक्रमांद्वारे आम्ही भारतात व्यवसाय सुरू करण्याची प्रक्रिया अधिक जलद आणि सोपी करण्यासाठी कटिबद्ध आहोत. ‘कल्पनेपासून उद्योगापर्यंत’चा हा प्रवास सोपा आणि वेगवान व्हावा यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करत आहोत.
महाराष्ट्रात उच्च दर्जाच्या ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर्स (जीसीसी) साठी उत्कृष्ट वातावरण उपलब्ध आहे. रॅपिड7च्या उपस्थितीमुळे एआय आणि सायबर सुरक्षिततेच्या क्षेत्रातील आमची ताकद आणखी वाढेल, याबद्दल आम्हाला विश्वास आहे. आमच्या नवीन जीसीसी धोरणाचा लाभ घेत रॅपिड7 उच्च कौशल्याच्या नोकऱ्या निर्माण करेल आणि राज्यातील युवकांसाठी भविष्यासाठी तयार असलेले मनुष्यबळ घडवेल, अशी अपेक्षा आहे.”
कोरी थॉमस, सीईओ, रॅपिड7 यांनी सांगितले:“भारतामध्ये विस्तार करणे हे रॅपिड7साठी अत्यंत महत्त्वाचे आहे. यामुळे सुरक्षा ऑपरेशन्स आणि ग्राहक-केंद्रित नवकल्पनांमध्ये गुंतवणूक वाढेल. गुंतागुंतीच्या समस्यांवर उपाय शोधण्यासाठी विविध कौशल्य असलेल्या टीम्स एकत्र आल्या की नवकल्पना अधिक मजबूत होते. पुण्यातील हे नवीन सेंटर् आम्हाला जगभरातील ग्राहकांना अधिक लवचिक, अचूक अंदाज देणारे आणि तत्पर सायबरसुरक्षा उपाय देण्यास सक्षम करेल. तसेच पुण्यात सिक्युरिटी ऑपरेशन्स सेंटर सुरू झाल्यामुळे आम्हाला जागतिक स्तरावर प्रीएम्प्टिव्ह एमडीआर सेवा वाढवता येईल. तसेच, या भागातील उत्कृष्ट तंत्रज्ञान कौशल्य असलेल्या लोकांना चांगल्या करिअरच्या संधी उपलब्ध होतील. भारतात जागतिक दर्जाची टीम तयार करण्यास आम्ही उत्सुक आहोत. ही टीम एआय-आधारित व्यवस्थापित सायबरसुरक्षा ऑपरेशन्सच्या भविष्यात महत्त्वाची भूमिका बजावेल.”
रॅपिड7 बद्दल
रॅपिड7 (NASDAQ: RPD) ही एआय-आधारित मॅनेज्ड सायबरसुरक्षा ऑपरेशन्स क्षेत्रातील जागतिक आघाडीची कंपनी आहे. जगभरातील संस्थां सा त्यांच्या सायबर सुरक्षा मजबूत करण्यासाठी रॅपिड7वर विश्वास ठेवतात. रॅपिड7 कमांड प्लॅटफॉर्म हा ओपन आणि लवचिक प्लॅटफॉर्म असून, तो सुरक्षा संबंधित माहिती एकत्र करतो आणि त्यात एआय, थ्रेट इंटेलिजन्स तसेच 25 वर्षांचा अनुभव आणि नवकल्पना यांची भर घालतो. यामुळे धोके कमी होतात आणि हल्लेखोरांना रोखणे शक्य होते. रॅपिड7 प्रीएम्प्टिव्ह मॅनेज्ड डिटेक्शन अँड रिस्पॉन्स (MDR) मध्ये आघाडीचा ब्रँड आहे. तो एक्स्पोजर आणि डिटेक्शन यांना एकत्र आणून प्रभावी सुरक्षा उपाय प्रदान करतो. आतापर्यंत जगभरातील 11500 हून अधिक ग्राहकांच्या सायबरसुरक्षा ऑपरेशन्समध्ये रॅपिड7 सकारात्मक बदल घडवत आहे.अधिक माहितीसाठी कंपनीच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या किंवा त्यांचा blog वाचा, LinkedIn किंवा X वर फॉलो करा.