कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या सत्काराने झाली. यावेळी परमपूज्य डॉ. श्री. १०८ निलकंठ शिवाचार्य महाराज (धारेश्वर), श्री. १०८ शिवानंद शिवाचार्य महाराज (वाळवा), श्री. १०८ महादेव शिवाचार्य महाराज (वाई), श्री. १०८ अमृतेश्वर शिवाचार्य महाराज (जिंतूर) आणि श्री. १०८ प्रमुदेव शिवाचार्य महाराज (माढा) यांचे दिव्य सान्निध्य लाभले.
या प्रसंगी शिवदीक्षा आणि अय्याचार्य विधी पार पडले. पारंपरिक मंत्रोच्चार आणि पूजाविधीमुळे परिसर भक्तीमय झाला होता. अमृतेश्वर महाराजांनी १०८ गायी पाळून शुद्ध भस्म उपलब्ध करून देण्याचा संकल्प जाहीर केला. माढेकर महाराजांनी शिवसाधनेचे महत्त्व सांगितले, तर महादेव महाराजांनी शिव-शक्ती एकत्वाचा संदेश दिला. वाळवेकर महाराजांनी संघटित राहण्याचे आवाहन केले आणि डॉ. निलकंठ महाराजांनी समाजासाठी वेळ व दान देण्याचे महत्त्व पटवून दिले.
प्रमुख उपस्थितीमध्ये श्री. सुनील रकवारी (अध्यक्ष – वीरशैव संघ, कात्रज), श्री. अनिल गाडवे (अध्यक्ष – विश्वेश्वर सहकारी बँक), श्री. अभिजीत रकवारी (अध्यक्ष – महादेव मंदिर ट्रस्ट, शिवाजीनगर, पुणे) आणि श्री. वैजनाथ पगारे (मुख्याध्यापक) यांचा समावेश होता.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सोमनाथ हिरेमठ यांनी केले, तर पौरोहित्य मान्यवर आचार्यांच्या हस्ते पार पडले. विविध वीरशैव लिंगायत संस्था, महिला मंडळे आणि सेवा मंडळांच्या सहकार्याने हा जयंती सोहळा यशस्वीरीत्या संपन्न झाला.
भक्ती, एकता आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश देत हा भव्य सोहळा उत्साहात आणि जल्लोषात पार पडला.