सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • ज्याची भीती होती, तेच झालं...इराण आणि अमेरिका-इस्त्रायल युद्धाच्या झळा मुंबईपर्यंत पोहोचल्या; आज 20 टक्के हॉटेल्स बंद!
  • विश्वविजेत्या टीम इंडियाचा मुंबईत पुन्हा भव्य रोड शो; तारीखही आली समोर, BCCI लवकरच अधिकृत घोषणा करण्याची शक्यता
 शहर

नऱ्हे परिसरात नवीन जलवाहिनी कामांचे भूमिपूजन; नागरिकांच्या पाण्याच्या प्रश्नाला दिलासा

गजानन मेनकुदळे    10-03-2026 10:43:51

 पुणे : खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे आमदार भीमराव अण्णा तापकीर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच नगरसेविका जयश्री सत्यवान भूमकर आणि श्री. सागर सत्यवान भूमकर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे नऱ्हे परिसरातील विविध भागांमध्ये नवीन जलवाहिनी टाकण्याच्या कामाचे भूमिपूजन उत्साहात पार पडले. या कामामुळे परिसरातील नागरिकांना दीर्घकाळापासून भेडसावत असलेल्या पाणीटंचाईच्या समस्येवर मोठा दिलासा मिळणार असल्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

या प्रकल्पांतर्गत तक्षशिला टाकी ते झील कॉलेज चौक, सेल्फी पॉइंट ते दरोडे जोग टाकी, दरोडे जोग टाकी ते बँक ऑफ महाराष्ट्र तसेच नवसकर वस्ती ते चव्हाण वस्ती या परिसरांमध्ये नवीन जलवाहिनी टाकण्याचे काम करण्यात येणार आहे. या जलवाहिनीमुळे परिसरातील पाणीपुरवठा अधिक सक्षम होऊन नागरिकांना नियमित आणि पुरेशा प्रमाणात पाणी मिळण्यास मदत होणार आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे आणि परिसराच्या झपाट्याने होत असलेल्या विकासामुळे पाण्याची मागणी वाढली असून त्या पार्श्वभूमीवर हे काम महत्त्वाचे ठरणार आहे.

या भूमिपूजन कार्यक्रमाला प्रभाग क्रमांक ३४ चे नगरसेवक हरिदास चरवड, नगरसेविका कोमल नवले, नगरसेविका जयश्री भूमकर, नगरसेवक राजाभाऊ लायगुडे, गंगाधर भडावळे, मंडळ अध्यक्ष यशवंत लायगुडे, प्रभाग अध्यक्ष राजू कुटे यांची प्रमुख उपस्थिती होती.तसेच शेखर वाल्हेकर, सुनील अण्णा वाल्हेकर, संभाजी काकडे, श्रीरंग वाल्हेकर, प्रदीप भूमकर, बजरंग खेडेकर, आकाश कुटे, माजी उपसरपंच सतीश कुटे, अक्षय इंगळे, कोमल सुशांत कुटे, रमेश गायकवाड, अनिल मते, दशरथ मनेरे, संदीप वाल्हेकर, अथर्व खेडेकर, विश्वजीत कुलकर्णी, निखिल चांकर, प्रियंका पवार, बेबी सातपुते, अभय चिरडे, संदीप चरवड, मनिषा बाराते, गीतांजली भालेराव, लक्ष्मी अनगडकर, निर्मला अरुण, रेणुका दूधभाते, सारिका हिरगुडे, उत्तम यादव, विष्णू माने, संदीप कुलकर्णी, सुधीर गोखले तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

परिसरात सुरू असलेल्या विविध विकासकामांमुळे स्थानिक नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात असून नवीन जलवाहिनीमुळे नऱ्हे परिसरातील पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात सुटण्यास मदत होईल, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली. तसेच या कामासाठी प्रयत्न करणाऱ्या आमदार व नगरसेविकांचे नागरिकांनी आभारही मानले.


 Give Feedback



 जाहिराती