सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • गॅस सिलेंडरच्या तुटवड्यामुळे पुण्यातील हॉटेल बंद होण्याची शक्यता; नोकरदार, विद्यार्थी अन् नागरिकांची तारांबळ
  • ज्याची भीती होती, तेच झालं...इराण आणि अमेरिका-इस्त्रायल युद्धाच्या झळा मुंबईपर्यंत पोहोचल्या; आज 20 टक्के हॉटेल्स बंद!
  • विश्वविजेत्या टीम इंडियाचा मुंबईत पुन्हा भव्य रोड शो; तारीखही आली समोर, BCCI लवकरच अधिकृत घोषणा करण्याची शक्यता
 विश्लेषण

मुंबईत विश्वविजेत्या टीम इंडियाचा भव्य विजय रोड शो; 11 किंवा 12 मार्चला सोहळा होण्याची शक्यता

डिजिटल पुणे    10-03-2026 11:13:09

मुंबई : भारताच्या ऐतिहासिक टी-20 विश्वचषक 2026 च्या विजयानंतर क्रिकेट चाहते टीम इंडियाच्या भव्य विजय परेडची आतुरतेने वाट पाहत आहेत. बीसीसीआयने अद्याप अधिकृतपणे वेळापत्रक जाहीर केलेले नसले तरी, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विश्ववेजेत्या टीम इंडियासाठी एक भव्य रोड शो आयोजित करण्याचा प्लॅन तयार केला जात आहे. 

टी-20 विश्वचषक 2026 जिंकल्यानंतर भारतीय क्रिकेट संघाच्या विजयाचा उत्सव साजरा करण्यासाठी मुंबईत भव्य रोड शो आयोजित करण्याची तयारी सुरू आहे. बीसीसीआयकडून अद्याप अधिकृत घोषणा झालेली नसली तरी, सूत्रांच्या माहितीनुसार 11 किंवा 12 मार्च रोजी हा विजय सोहळा होऊ शकतो.

मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय संघ प्रथम नवी दिल्लीत पोहोचणार आहे. तेथे खेळाडू पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्याची शक्यता आहे. त्यानंतर संपूर्ण संघ मुंबईकडे रवाना होईल. मुंबईत आयोजित करण्यात येणारा विजय रोड शो नरिमन पॉइंटपासून वानखेडे स्टेडियमपर्यंत काढला जाऊ शकतो. शेवटी वानखेडे स्टेडियममध्ये विशेष समारंभ होऊन संपूर्ण संघाचा सन्मान केला जाण्याची शक्यता आहे.

या कार्यक्रमात बीसीसीआयकडून खेळाडूंना विशेष बक्षिसे देण्याचीही तयारी असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, मोठ्या संख्येने चाहते उपस्थित राहण्याची शक्यता लक्षात घेऊन मुंबई पोलीस आणि प्रशासनाकडून सुरक्षा व गर्दी नियंत्रणासाठी विशेष योजना आखली जात आहे.यापूर्वीही भारताने 2007 आणि 2024 मध्ये टी-20 विश्वचषक जिंकल्यानंतर मुंबईत भव्य विजय मिरवणूक काढण्यात आली होती. त्यामुळे यंदाचा रोड शोही तितकाच भव्य आणि ऐतिहासिक ठरण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, अंतिम सामन्यात भारताने न्यूझीलंडचा पराभव करत विजेतेपद पटकावले. भारतीय फलंदाजांनी आक्रमक खेळी करत 20 षटकांत 5 बाद 255 धावा उभारल्या. संजू सॅमसन, अभिषेक शर्मा आणि इशान किशन यांनी दमदार अर्धशतके ठोकत संघाला मोठी धावसंख्या उभारून दिली. प्रत्युत्तरात न्यूझीलंडचा डाव 159 धावांवर आटोपला. भारताकडून जसप्रीत बुमराहने चार तर अक्षर पटेलने तीन विकेट घेत निर्णायक कामगिरी केली.


 Give Feedback



 जाहिराती